डांगसौंदाणे- सोमपूर येथील आदिवासी भील्ल समाज सेवा बहुद्देशीय संस्थेमार्फत तसेच स्थानिक व परिसरातील आदिवासी बांधवांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच आदिवासी क्रांतिकारक, ज्यांना त्याकाळातील ब्रिटिश सरकारने इंडीयन रॉबिनहूड ही पदवी बहाल केली होती असे महान क्रांतिकारक टंट्यामामा भील जयंतीनिमित्त मालेगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी देखील टंट्यामामा भील व भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. यावेळी जाधव यांनी टंट्यामामा भील यांच्या संघर्षाची व बलिदानाचे थोडक्यात समाजबांधवांसमोर ऐतिहासिक पुरावा देत आपले मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी अंकुशे यांनी देखील प्रतिमा पूजन करुन आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रविण पवार , सचिव मश्चिंद्र बोरसे, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार,जितु सोनवणे,अनिल गायकवाड, बली गायकवाड, सुनील गायकवाड,राजेंद्र मोरे,शिवाजी गायकवाड, भगवान गायकवाड, अक्षय गायकवाड,विश्वास गांगुर्डे,दादा ठाकरे,दिलीप माळी,दिपक सोनवणे,विलास सोनवणे आदींसह मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.