इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पूर्व आफ्रिकन देश सोमालियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मुंबईवर झालेल्या २६-११ या दहशतवादी हल्ल्यासारखाच हा हल्ला आहे. हा हल्ला पाहून अनेकांना २६-११ची आठवण आली आहे. राजधानी मोगादिशूमधील एका हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १४ तासांच्या थरारानंतर हा हल्ला थोपविण्यात यश आले आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जबरदस्त चकमक झाली. वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी या बीचफ्रंट हॉटेलचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. अखेर सुरक्षादलांना यश आले आहे. सर्व दहसथवादी ठार झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-कायदाशी संबंधित अल-शबाबने मोगादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी दोन कार स्फोट घडवले होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हॉटेल हयातला दोन कार बॉम्बने लक्ष्य करण्यात आले. एक हॉटेलच्या बॅरियरजवळ घडला आणि त्यानंतर हॉटेलच्या गेटवर स्फोट झाला. आम्हाला विश्वास आहे की सैनिक हॉटेलच्या आत आहेत.
https://twitter.com/MoredNews/status/1560834328296292354?s=20&t=9E_Z0jnKtXOjAK2n2ufTKA
मीडिया रिपोर्ट्सनुसार सुरक्षा अधिकारी अब्दुकादिर हसन यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये गोळीबार सुरू आहे. विशेष म्हणजे हयात हे मोगादिशूच्या लोकप्रिय क्षेत्रांपैकी एक आहे. येथे अनेक हॉटेल्स आहेत, ज्यामध्ये मोठे सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक येत असतात.
दहशतवादी हल्ल्यादरम्यान, विशेष पोलिस युनिटने डझनभर लोकांना वाचवल्याचे वृत्त आहे. यामध्ये हॉटेल कर्मचारी आणि काही पाहुण्यांचा समावेश आहे. हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये सरकारी बैठक सुरू होती, असे सांगण्यात येत आहे. अल-शबाब अनेक वर्षांपासून सोमालियामध्ये सरकारविरोधात सक्रिय आहे. सोमालियाच्या दक्षिण आणि मध्य भागात या दहशतवादी संघटनेचे बऱ्यापैकी नियंत्रण आहे.
https://twitter.com/singhpuru2202/status/1560844267324465153?s=20&t=9E_Z0jnKtXOjAK2n2ufTKA
Somalia Hyatt Hotel Terrorist Attack 11 dead