प्रदोष तिथी महात्म्य
पंडित दिनेश पंत
प्रदोष तिथी दिवशी भगवान शंकराचे पूजन व उपवास केला जातो. अनेक शिवभक्त प्रदोष तिथी नित्यनेमाने पाळत असतात. प्रदोष या दिवशी भगवान शंकराचे दर्शन अभिषेक पूजाअर्चा उपवास तसेच मौन व्रत पाळतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण व शुक्ल पक्षामध्ये प्रत्येकी एक प्रदोष तिथी येते.
प्रदोष हा भगवान शंकर आराधनेशी संबंधित असल्याने व सोमवार हा भगवान शिवाचा आराधना दिवस असल्याने सोम प्रदोष म्हणजेच सोमवारी येणाऱ्या प्रदोष तिथीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे काही शिवभक्त फक्त सोमप्रदोष पाळतात.
यंदाच्या वर्षीचे सोमप्रदोष हे दिनांक २४ मे, ७ जून व ४ ऑक्टोंबर अशा तीन दिवशी येणार आहेत. तसेच या वर्षी एकूण २५ प्रदोष आहेत. आता उर्वरित महिन्यातील प्रदोषाच्या तारखा पुढील प्रमाणे २४ मे, ७ व २२ जून, ७ व २१ जुलाई, ५ व २० ऑगस्ट, ४ व १८ सप्टेंबर, ४ व १७ ऑक्टोबर, २ व १६ नोव्हेंबर, २, १६, ३१ डिसेंबर.