मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तिरूपती येथे दर्शनासाठी सोलापूर येथून गेलेल्या तरुणांच्या वाहनाला काल तिरूपतीजवळ अपघात झाला. त्याच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तिरूपती देवस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचाराबाबत सोलापूर प्रशासनाला निर्देश दिले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Solapur Youth Road Accident Government Help Declare