सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमणा मारणाऱ्या पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहे. त्या सोशल मीडियावर सतत फिरत असतात. मानवी स्वभावावर नेमके बोट ठेवत विनोद साधणाऱ्या या पाट्या कायमच महाराष्ट्रात चर्चेच्या विषय राहिल्या आहेत. पण, सोलापूरमध्ये भन्नाट मजकूर लिहीलेल्या एका बॅनरने पुण्यालाही मागे टाकले आहे. ‘शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये’, असे लिहीलेला हा बॅनर सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
बरेच जण मॉर्निंग वॉकला जाताना स्वत:च्या पाळीव कुत्र्याला घेऊन जातात. त्या कुत्र्यांचा इतरांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराभोवती असलेल्या वॉकिंग ट्रॅकवर हा फलक लावण्यात आला आहे.
या वॉकिंग ट्रॅकवर सकाळापासून लोक व्यायम करण्यासाठी व धावण्यासाठी येतात. परंतु, कुत्र्यांमुळे ट्रॅकवर घाण होत असल्यामुळे सर्वच जण नाराजी व्यक्त करत होते. अखेरी एका हुशार व्यक्तीने या पद्धतीचे बॅनर लावले आहे. या अनोख्या फलकाबद्दल बद्दल सोलापूरकरांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे. या फलकानंतर तरी कुत्रे मालक शाहणे होतील का, अशी चर्चा रंगली आहे.
मोकाट जनावरांचाही त्रास
गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात मोकाट कुत्र्यांचाही त्रास आहे. मोकाट कुत्र्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडताहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मोकाट जनावरांमुळे सोलापूरकरांचे रस्त्यावर वावरणे कठीण झाले आहे. दिवसा रस्त्याच्या मधोमध गुरे बसून असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, तर रात्री रस्त्यावर कुत्री गटागटाने बसलेली असतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर जातात, याबाबतही सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Solapur Hatke Banner Siddheshvar Mandir Lake Area