सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात एका चोराने अतिशय शिताफीने सोनाराला गंडा घातला आणि कलेक्टर अॉफीसमधून तो चोर अगदी सहज पसार झाला. सोनारासाठी मात्र हा खूप मोठा धक्का ठरला आहे. कारण ज्या पद्धतीने चोराने त्याच्यासोबत डील केले तो मुळीच चोर वाटत नव्हता.
मुळात चोराने आपण जिल्हाधिकारी साहेबांचा चालक असल्याचे सांगितल्यामुळे सोनाराचा विश्वास बसला. विजापूर नाक्यावर निहाल ज्वेलर्सचा मालक मुल्ला याने सोनाराला गंडा घातला. आपण जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन चालक आहोत. जिल्हाधिकारी हे बैठकीला आलेल्यांना सोन्याची अंगठी आणि लॉकेट भेट देणार आहेत, अशी बतावणी केली. सुरुवातीला या चोरट्याने सोनार दुकानातील एका व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत नेले. जिल्हाधिकारी एका बैठकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीने मुल्ला यांना थोडा वेळ बसण्यास सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी वेळ लागत असल्याचे सांगितले. मुल्ला यांचा आरोपीवर विश्वास बसला. आरोपीने दुकानात जाऊन सोने खरेदी करून जिल्हाधिकाऱ्यांना दाखवू असे म्हणत परत दुकानात आले. त्यानंतर पुन्हा दुकानात येऊन आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट असा जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला. आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट खरेदी केल्यानंतर बील जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर देतो असे देखील सांगितले. त्यानंतर सोनार आणि आरोपी हे दोघेही आठ अंगठ्या आणि लॉकेटसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
येथे आल्यानंतर आरोपीने सोनारास प्रतीक्षा कक्षात बसवले. अंगठीचे सॅम्पल दाखवून येतो असे सांगून आरोपी तिथून निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर ही आरोपी न आल्याने सोनाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.
कलेक्टर ऑफीसमध्ये नेऊन गंडवले
जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकर घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिका तपास करत आहे. सीसीटीव्हीवरून संशयिताचा शोध घेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आरोपी बाहेर पडल्यानंतर ज्या रिक्षातून गेला त्या रिक्षा चालकाची देखील चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
Solapur Collector Office Theft Gold Police Crime