बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अहो आश्चर्यम्! रेकॉर्डब्रेक वेळेत विद्यायार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती

हुश्श सुटलो धावपळीतून ! परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त भावना, सामाजिक न्यायाची देशातील सर्वोत्तम कामगिरी!

ऑगस्ट 22, 2021 | 4:37 pm
in इतर
0
IMG 20210822 WA0012

शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण विभाग

*सर माझे वडील मजुरी करतात, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अमेरिकेत शिक्षणासाठी जाईल. ते शक्य झाले आहे समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन, यावर विश्वासच बसत नाही* ” ही भावना आहे, लंडन येथील (The University of Edinburgh) मध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग (Manual Scavaenging) याविषयाचे संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या भंडाऱ्याची शिवानी वालेकर या विद्यार्थीनीची.

“ *सर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एका खेडेगावात गाई-म्हशींचे पालन-पोषण करून शेण-मातीचं कामाबरोबरच पडेल ते काम केलं. आदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने पाण्यासाठी १/२ किलोमीटर रोजची वणवण अशा परिस्थिती कुटूंबाच्या उदर्निर्वाहासाठी प्रयत्न करत शिक्षण सोडले नाही, व समाज कल्याण विभागाची शिष्यवृतीच्या पुण्याई मुळेच वाडीव-हे जिल्हा नाशिक ते वाशिंग्टन हा माझा प्रवास हा हजारो विद्यार्थासाठी मार्गदर्शक ठरल्यास जिवनाचे सार्थक होईल* ,” अशी भावुक प्रतिकिया होती, नाशिकच्या चारुदत्त म्हसदे यांची. एम.टेक झालेले चारुदत्त यांची अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठ मानवी शरीरातील विविध भागासाठी लागणाऱ्या उपकरणांचा शोध व त्यात सुधारणा या विषयावर संशोधनासाठी निवड झाली आहे.

तर आजही अमरावतीच्या भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विकासाचे जीवन म्हणजे म्हणतात ना अठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत वडिलांना चहा टपरी चालवण्यास मदत करुन शिक्षण पूर्ण केले. आणि विशेष म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या लंडनच्या केंब्रिज विद्यापीठाच्या व बाबासाहेबांचे गुरु असलेले जॉन डुई हे संस्थापक असलेल्या टीचर्स कॉलेज मध्ये जगातील शिक्षण पध्दतीवर संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या अमरावतीच्या विकास तातड या विद्यार्थ्यांची भावना तर नक्कीच डोळ्यात पाणी आणते.

असे एक नाही तर अनेक विषयात प्राविण्य मिळविलेले सर्वसामान्य कूटुंबातील विद्यार्थी आपल्या भावना समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याकडे व्यक्त करत होते. जणू हा काही कौटुंबिक सोहळा असून विद्यार्थी आपली सुखदुःखे एकमेकाशी व शासकीय अधिकारी यांच्याशी अदान प्रदान करत होते,सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा अनोखा कार्यक्रम रात्री उशिरापर्यत चालू होता.

निमित्त होते…. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षात निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली असुन त्यांचे मुळ कागदपत्रे तपासणी व त्यांना अंतिम मजुरी आदेश देण्याबाबत दिनांक २०/०८/२०२१ रोजी आयोजित शिबीर.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या योजनांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहे.

१०० % कोटा पुर्ण होत आहे, व त्यातूनच गेल्या दहा वर्षातील रेकॉर्डब्रेक कामगिरी या वर्षी झाली आहे. तसे बघितले तर देशात परदेश शिष्यवृत्ती योजनेबाबत विभागाची सर्वोत्तम कामगिरी झाली असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण अवघ्या काही दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्धी करणे पासून अर्ज स्वीकारणे, तपासणे, त्रुटींच्या अर्जाची पूर्तता करून घेणे,गृह चौकशी करणे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे, या सर्व बाबी चा विचार करता तसेच कोविडची परिस्थीती विचारत घेता विद्यार्थाच्या मागणी नुसार वेळोवेळी देण्यात आलेली मुदतवाढ, राज्यात व देशात कोरोणाचे संकट गंभीर कमी दिवसाच्या कालावधीमध्ये व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विभागाने रात्रीचा दिवस करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून अंतिम मजुंरी आदेश दिले आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीने शिष्यवृत्ती दिली जात असली तरी सर्वांत आधी व तितक्याच वेगाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केलेली कामगिरी ही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा असून निश्चितच सुखवाह ठरली आहे. या कामागिरीमुळे विद्यार्थी देखील आश्चर्यचकित झाले आहेत. दरवर्षी असंख्य विद्यार्थी परदेशात जात असले तरी त्यात सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी प्रथमच शिष्यवृती योजनेमुळे जात असल्याने व इतरही बरिच प्रक्रिया करावी लागत असल्याने ते निश्चितच तणावात असतात, त्यामुळेच त्याचा ताण कमी झाल्याने हुश्श सुटलो धावपळीतून ! म्हणून विद्यार्थी निश्चित झाले आहेत व त्यांचा परदेशाचा प्रवास सुखकर होणार असल्याने त्यांनी काल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्र तपासणी शिबिरात आपल्या भावना वाट मोकळी करुन दिली.

सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या गतीशील निर्णयामुळे तसेच विभागाचे अपर मुख्य प्रधान सचिव अरविंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे आयुक्त श्री प्रशांत नारनवरे यांनी या यावर्षाची योजना धडाक्यात मार्गी लावली. शासन निर्णय दिनांक 12 ऑगस्ट २०२१ नुसार शासनाने 75 विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निवड केली आहे. विभागाने यावर्षी व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केल्याने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडातील सर्वाधिक ३०० हुन अधिक अर्ज चालू वर्षी प्राप्त झाले होते व त्यातून प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. तसेच सध्याचे कोविडचे वातावरण व सर्वसामान्यांना शासकीय कामाचा अनुभव लक्षात घेता ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र विद्यार्थ्यांच्या सर्व शंका दूर कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण करून विभागाने सर्व विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

दिनांक २०/०८/२०२१ रोजी विद्यार्थ्यां बरोबर आलेल्या पालकांना शिष्यवृत्ती मंजुरीचे अंतिम आदेश हातात मिळाल्याने सुखद धक्का बसला, अनेकांना तर विश्वासच बसत नव्हता तर अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी दिली. हे सर्व शक्य झाले आहे ते विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या कृतिशील निर्णयांमुळे. विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या प्रशासकिय गतिमानता व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मेहनत याचा संगम होत हा अनोखा कार्यक्रम काल रोजी पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संपन्न झाला.

विभागाकडे प्राप्त झालेल्या सुमारे तीनशेहून अधिक अर्जदारांना योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली तसेच कोविड्च्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना फॉर्म वेळेत सादर करता आले नाही ,त्यांनी मुदतवाढ मिळणे संबंधी मागणी केल्याने तात्काळ मंत्री महोदयांनी त्यात दिलेली मुदतवाढ तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑनलाइन बरोबरच, ऑफलाईन पोस्टाने देखील अर्ज स्वीकारण्यात आले.

विद्यार्थ्याच्या सर्व कागदपत्राची तपासणी आयुक्तालयाने अतिशय गतिमान करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तालयाच्या छानणी समितीने प्रस्ताव छानणी करून शासनास सादर केले होते, तितक्याच गतिमान तिने शासनाकडून ७५ विद्यार्थ्यांची निवड शासन निर्णय द्वारे करण्यात आली..एकंदरीतच शासनाचे काम चार हात लांब अशी जी म्हण प्रचलित आहे या म्हणीला छेद देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाने केले असून सामाजिक न्याय विभागाचे शिष्यवृत्ती योजनेबाबत केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.

सदर कागदपत्र तपासणी व छानणीकामी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे , प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड, सहाय्यक आयुक्त विद्यानंद चल्लावार, सहाय्यक आयुक्त संगीता डाखकर, सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, यांच्यासह विभागाच्या शिक्षण शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले.त्यासर्वाचे पालकानी धन्यवाद व्यक्त केले.

—

“ परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या* *निकषात सुधारणा केल्याने 2003 नंतर प्रथमच योजनेचा कोटा 100% पूर्ण झाला व गरजू विद्यार्थ्यांना योग्य संधी* *मिळाली याचे समाधान आहे. एकूण लाभार्थी संख्या 75 वरून 200 करण्याचा आमचा मानस आहे* ”
– मा.श्री धनंजय मुंडे.,मा.मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
—
“जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतीही अडचण भासू नये त्यांना वेळेत परदेशात जाता यावे जेणेकरून त्यांच्या* *शिक्षणात कुठलाही बाधा येऊ नये यासाठी विभागाने गतिमान पद्धतीने यावर्षी शिष्यवृत्ती मंजूर केलेले आहे* ”.

– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला; सोशल मिडियात टीकास्त्र

Next Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
carona 11

नाशिक अपडेट - शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011