नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलां व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दहावी मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एकूण 90 चे निवासी पैकी 77 निवासी शाळांचा निकाल हा 100% लागला आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल समाजातील सर्वच घटक आतून विभागाचे कौतुक करण्यात येत आहे.
समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी देखील निवासी शाळेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या सर्व शाळांमधून 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क (गुण) मिळवणारे 119 विद्यार्थी आहेत हे विशेष.
90 निवासी शाळांपैकी 77 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, 6 शाळांचा निकाल 95 टक्के लागला आहे, तर 4 निवासी शाळांचा निकाल 90 टक्के लागला आहे. या सर्व निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक अमरावती विभागाच्या -कु.रुपाली रमेश सभादींडे हिने पटकावला आहेत तिला 95.80% गुण मिळाले आहेत तर ,द्वितीय क्रमांक -कु.गायत्री रामकृष्ण सरदार हिचा असून तिला 95.20% गुण मिळाले आहेत.तर तृतीय क्रमांक कु.ममता बाळू तायडे हिल 95 % गुण मिळाले आहेत. या सर्व समाज कल्याण विभागाच्या शाळांमध्ये देखील मुली अव्वल स्थानी राहिल्या आहेत.
राज्यातील सर्व निवासी शाळा यांचा या कामगिरीबद्दल समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना बरोबरच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी, शिक्षक यांचे देखील अभिनंदन केले आहे.
“राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या इयत्ता दहावीतील लक्षणीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, येणाऱ्या काळात देखील गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न विभागाच्या वतीने करण्यात येणार असून लवकरच या निवासी शाळांमध्ये सी बी एस सी अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे”
– डॉ. प्रशांत नारनवरे (आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे)