नशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आदर्श होण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून या शाळा आदर्श करण्याबरोबरच राज्यातील खाजगी शाळांच्या धर्तीवर मॉडेल शाळा म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुण्यात नुकतेच निवासी शाळा मधील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव समारंभ व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी यावर शिक्कामोर्तब करण्यात आला करण्यात आला. राज्यातील ४५ जणांचा यावेळी सन्मान करण्यात आला त्यात नाशिक विभागातील एकुण ७ जणांना सन्मानित करण्यात आले त्यात २ मुख्याध्यापक व ५ शिक्षकांना समावेश आहे.
समाज कल्याण विभागाच्या आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राज्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवासी शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक यांचा नुकताच विभागीय स्तरावर सन्मान करण्यात आला होता. या सर्व पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी तीन दिवसाची “फुलेवाडा शैक्षणिक कार्यशाळा” समाज कल्याण आयुक्तालय पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांचे केलेल्या कार्याचे सादरीकरण करण्यात येऊन इतर शाळांमध्ये देखील कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल यावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्ली शासनाच्या धर्तीवर समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा देखील सीबीएससी अभ्यासक्रम राबवून आदर्श करणे साठी सर्वांनी उपाययोजना कराव्यात, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मॉडेल शाळा निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी आयुक्त यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या , मुख्याध्यापक व शिक्षक यांचा आयुक्तालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी सह आयुक्त श्री भारत केंद्रे, उपायुक्त श्री विजयकुमार गायकवाड, उपसंचालिका श्रीमती निशादेवी बंडगर ,उपायुक्त उमेश सोनवणे यांच्यासह राज्यातील शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social welfare Department Residential Schools Ideal