नाशिक – राज्यातील समाज कल्याण विभागातील विविध सर्वगातील कर्मचारी यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासबंधी पुढाकार घेतला आहे. विभागातील सर्व पदनिहाय आढावा घेण्यात आला असून सर्व पदाच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणेबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात समाज कल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय पदोन्नती समितीची बैठक संपन्न झाली आहे. सदर बैठकीत समाज कल्याण निरीक्षक या संवर्गातील कर्मचारी यांना गृहपाल या संर्वगात पदोन्नती देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे इतर संर्वगाच्या पदांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात येत असुन दि.२३/१२/२०२१ रोजी राज्यस्तरीय पदोन्न्ती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात देखील काही संर्वगाच्या पदाना पदोन्न्ती देण्यात येणार आहे. समाज कल्याण विभागातील एकुण पात्र ठरलेल्या ११२ कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देखील नुकतेच मंजुर करण्यात येऊन आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखली आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी समाज कल्याण विभागात यापूर्वी देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, तसेच विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. त्याच बरोबर कर्मचारी सेवा पुर्नस्थापित/ नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न, नागरिक उन्मुख प्रशासकीय गतीमानता अभियान, कर्मचारी कौशल्य विकास अभियानाची ,कामात सुसूत्रता , अभिलेखे अद्यावत करणे, कामात गतिमानता/ डेली डिस्पोजल, नेतृत्व विकास मंथन शिबीर, फुले वाडा शैक्षणिक योजना , सेवा निवृत्ती विषयक प्रकरणे तिमाही आढावा राज्यातील २६ जिल्ह्यातील ७२ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा मध्ये टाटा ट्रस्ट व सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस सी एल आर च्या मदतीने इंग्रजी भाषा आणि नेतृत्व विकास हा प्रकल्प मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण, गुणवंत कर्मचारी अधिकारी /कर्मचारी, कर्मचारी दिन संकल्पना, योजनांची मार्गदर्शिका तयार करणे, विविध योजनाचे सॉफ्टवेअर तयार करणे यासारखे उपक्र्म समाज कल्याण विभागात राबविण्यात आले आहे. समाज कल्याण विभागातील सेवनिवृत्त कर्मचा-यांना देखील आश्वासित प्रगती योजनेचा लाभ झाला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडून विभागाच्या कामकाजाबदल समाधान व्यक्त करुन धन्यवाद दिले आहे.