पुणे – राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंजूर केला असुन तसे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना निर्गमित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समाज कल्याण विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांना १०-२०-३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रंलंबित होता. कर्मचारी यांच्याकडुन याबाबत विचारणा होत होती, समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यानी यासबधी निर्देश दिले होते, त्याअंनुषगाने आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची नुकतीच बैठक सपन्न झाली होती. सदर बैठकीत पात्र असलेल्या विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानुसार आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
राज्यातील एकुण पात्र ठरलेल्या ११२ कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. त्यात गृहपाल संवर्गातील ११,समाज कल्याण निरिक्षक १२,उच्चश्रेणी लघुलेखक ४,कनिष्ठ लिपिक ८२, शिपाई ३ याप्रमाणे कर्मचा-याना लाभ मंजुर करण्यात आला आहे.काहि त्रुटिंमुळे अपात्र ठरलेल्या कर्मचारी यांच्या त्रुटिपुर्तता करुन पुढिल बैठकित लाभ देण्यात येणार आहे.
यापुर्वी देखील विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेले मासिक वेतन हे त्याच महिन्याच्या ३१ तारखेस किंवा पुढील महिन्याच्या १ तारखेस अदा होईल याची सर्व कार्यालयांनी दक्षता घ्यावी असे निर्देश आयुक्त यानी दिले आहेत, त्याचप्रमाणे विभागात कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तके सर्व नोंदी सह अध्यायावत करणेबाबत ही आयुक्तालयाने निर्देश दिलेले असून सर्व कार्यालय प्रमुखांना कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके खास मोहीम राबवून सर्व नोंदीसह अद्यावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
समाज कल्याण विभागाने यापूर्वी देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, तसेच विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देखील दिले.
त्याचबरोबर कर्मचारी सेवा पुर्नस्थापित/ नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी, नागरिक उन्मुख प्रशासकीय गतीमानता अभियान, कर्मचारी कौशल्य विकास अभियानाची, कामात सुसूत्रता, अभिलेखे अद्यावत करणे, कामात गतिमानता/ डेली डिस्पोजल, नेतृत्व विकास मंथन शिबीर, फुले वाडा शैक्षणिक योजना , मासिक वेतन वेळेवर करणे बाबत, मूळ सेवा पुस्तके नोंदी बाबत खास मोहीम , सेवा निवृत्ती विषयक प्रकरणे तिमाही आढावा, गोपनीय अहवाल, राज्यातील २६ जिल्ह्यातील ७२ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा मध्ये टाटा ट्रस्ट व सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस सी एल आर च्या मदतीने इंग्रजी भाषा आणि नेतृत्व विकास हा प्रकल्प मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण , गुणवंत कर्मचारी अधिकारी /कर्मचारी ,.कर्मचारी दिन संकल्पना , योजनांची मार्गदर्शिका तयार करणे, विविध योजनाचे सॉफ्टवेअर तयार करणे यासारखे उपक्र्म समाज कल्याण विभागात राबविण्यात आले आहे.