नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शासकीय वसतिगृहांतून हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे. समाज कल्याण विभागामार्फत राज्यात एकूण 441 शासकीय वसतिगृहे चालवली जातात या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थीना दर्जेदार सोयी सुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे यासाठी विभागाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यातुनच राज्यातील ३३ वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असुन त्यासाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व वसतिगृहांचे बाधकाम सदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता त्याप्रसंगी याबाबत माहिती दिली आहे. त्यात मुबई विभागास १.८१ कोटी, लातुर विभाग १.३२ कोटी, अमरावती विभाग २.७८ कोटी, पुणे विभाग १.२३ कोटी, नाशिक विभागास २४ लक्ष ७२ हजार,नागपुर विभाग २ लक्ष ४० हजार , औरंगाबाद विभाग ७ लक्ष ८७ हजार, याप्रमाणे एकुण ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध क्षेत्रीय कार्यालयाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
सदर निधीतून वसतिगृहांची विविध दुरुस्ती कामे, कपाटे अध्यायावत करणे, इमारत कलरिंग करणे, कोटींग करणे, आवार संकक्षण भिंत उभारणे, शौचालय,बाथरुम,खिडक्या,दरवाजे, तारेचे कम्पाउंड, भिंतींची दुरुस्ती, ग्राऊंड फ्लोरिगं, रोलिंग, पाण्याची टाकी, स्ट्रिट लाईट, पेव्हर ब्लॉक बसविणे, टाईल्स बदलविणे, वॉटर प्रुफिंग, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, बोअरवेल बाधकाम करणे अशी कामे करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यासाठी विशेषता शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणुन वसतीगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागात असणा-या वसतीगृहांतुन अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकासाची वसतीगृहे ही केंदे बनली आहेत. विद्यार्थांच्या जडणधडणीत मोलाचे स्थान ह्या वसतीगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्वाची भुमिका असलेल्या शासकिय वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती करुन सर्व आवश्यक सोईसुविधासह विद्यार्थाना निवासासाकरिता तसेच अभ्यासाकरिता पुरक वातावरण यामुळे उपलब्ध होणार आहे.
राज्यातील एकूण ४४१ शासकीय वसतीगृहापैकी ३३ वसतिगृहाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सन २०२१-२२ मध्ये प्राप्त झाले होते.त्यासदंर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत होता. मा. धनंजय मुंडे मंत्री, सामाजिक न्याय विभाग, व सचिव श्री सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर होऊन निधी उपलब्ध झाला आहे. सदर निधीतुन वसतीगृहाचा दर्जा अधिक उंचविण्याबरोबरच विद्यार्थाची गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.
– डॉ. प्रशांत नारनवरे (आयुक्त, समाज कल्याण, पुणे)
social welfare and justice department fund for hostel repairing seven crore students maintainance