पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज कल्याण विभागातील विविध संर्वगातील कर्मचारी यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालाने त्याचे कल्याण होणार आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासबंधी पूढाकार घेतला आहे. विभागातील सर्व पदनिहाय आढावा घेण्यात आला असुन विविध पदाच्या पदोन्न्तीचा प्रश्न मार्गी लावणात आला आहे.
समाज कल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पदोन्नती समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यानुसार समाज कल्याण विभागातील एकुण पात्र ठरलेल्या २१ समाज कल्याण निरिक्षक यांना वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक यापदावर तर २७ वरिष्ठ लिपिकांना प्रमुख लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली त्याबाबतचे आदेश दि.३०/०५/२०२३ निर्गमित करण्यात आले आहे. समाज कल्याण निरिक्षक व वरिष्ठ लिपिक सवर्गातील एकुण ४८ कर्मचारी याना पदोन्न्तीचा लाभ झाला आहे. त्यापैकी १० कर्मचारी नासिक विभागातील आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रादेशिक उपायुक्त श्री माधव वाघ यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील जिल्ह्याच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद असून बहुतांश कार्यालयांमध्ये हे पद रिक्त असल्याने अधिकारी यांच्यावर कामाचा ताण येत होता त्यामुळे अधिकारी वर्गाने वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक ही पदे भरण्याबाबत आयुक्त यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेता व कार्यालयाचे कामकाज सुरळीत होणे करिता वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक या पदावर २१ कर्मचारी यांच्या पदोन्नतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या महत्त्वाचे पदावर कर्मचारी उपलब्ध झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा तणाव कमी होणार आहे. त्यामुळे सदर निर्णयामुळे राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील आयुक्त यांचे आभार व्यक्त केले आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शानाखाली उपायुक्त (प्रशासन) प्रशांत चव्हाण यांच्या शाखेने यासाठी सात्यत्याने पाठपुरावा केला होता.
गृहपाल, समाज कल्याण निरिक्षक, कार्यालय अधिक्षक , वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक ,लघुटंकलेखक व शिपाई या विविध सवंर्गातील देखील कर्मचारी यांना यापुर्वीच पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे समाज कल्याण विभागाच्या कर्मचारी यांच्याकडुन समाधान व्यक्त करण्यात येत असुन आयुक्त यांचे आभार व्यक्त केले आहेत.
समाज कल्याण विभागाने सातत्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, त्याच प्रमाणे प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. कर्मचारी यांचे पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला असल्याने कर्मचारीमध्ये उत्साह निर्माण झाला असुन कामकाज अधिक गतिमान होणार आहे
– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त,समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे.
Social Welfare Department Employee Promotion