नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचारी यांचे कल्याण करण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातुनच विभागात कार्यरत असणा-या विविध संवर्गाच्या ३७ जणांना नुकताच १०,२० व ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभाची सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर केला आहे. त्यासबंधीचे आदेशही दि १३ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापुर्वी पहिल्या ट्प्यात एकुण १२३ कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर केला आहे. असे एकुण १६० कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित कर्मचारी यांच्याकडूनही कागद्पत्राची पुर्तता करुन घेण्यात येत आहे. त्यांनाही पुढच्या टप्यात लाभ मिळणार आहे.
समाज कल्याण विभागातील समाज कल्याण निरिक्षक, कार्यालय अधिक्षक,वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक , शिपाई या वर्ग ३ व वर्ग ४ संर्वगातील कर्मचा-यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सदर प्रश्न अनेक वर्षापासुन प्रंलबित होता. कर्मचारी यांच्याकडुन याबाबत मागणी होत होती, समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी यांसबधी निर्देश दिले होते, त्याअंनुषगाने आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक संपन्न झाली होती. सदर बैठकीत पात्र असलेल्या विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानुसार एकुण ३८ जणांना नुकतेच त्याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे विभागाअंतर्गत सेवा अर्हताकारी परिक्षेचा प्रश्न देखील आयुक्त यांनी मार्गी लावला असुन दिनांक २७,२८,२९ एप्रिल् २०२२ व दि. ८,९,१० मे २०२२ रोजी बार्टी पुणे येथे सर्व सर्वगातील परिक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जवळपास ६०९ कर्मचारी यांच्या परिक्षा होणार आहेत.विभागात प्रथमच मोठ्याप्रमाणावर परिक्षा होत असल्याने कर्मचारी यांनी विभागाचे धन्यवाद व्यक्त केले आहे. त्यात कनिष्ठ लिपिक-२७९, ,वरिष्ठ लिपिक-१२०, समाज कल्याण निरिक्षक -७१, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक -७, गृहपाल-१३२ याप्रमाणे एकुण ६०९ कर्मचारी यांच्या विभागाअंतर्गत सेवा अर्हताकारी परिक्षा होत आहे.समाज कल्याण विभागाने यापूर्वी देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, तसेच विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देखील दिले. त्याच बरोबर कर्मचारी सेवा पुर्नस्थापित/ नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी, नागरिक उन्मुख प्रशासकीय गतीमानता अभियान, कर्मचारी कौशल्य विकास अभियान ,कामात सुसूत्रता , अभिलेखे अद्यावत करणे, कामात गतिमानता/ डेली डिस्पोजल, नेतृत्व विकास मंथन शिबीर, फुले वाडा शैक्षणिक योजना , मासिक वेतन वेळेवर करणे बाबत , मूळ सेवा पुस्तके नोंदी बाबत खास मोहीम , सेवा निवृत्ती विषयक प्रकरणे तिमाही आढावा , गोपनीय अहवाल , राज्यातील २६ जिल्ह्यातील ७२ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा मध्ये टाटा ट्रस्ट व सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस सी एल आर च्या मदतीने इंग्रजी भाषा आणि नेतृत्व विकास हा प्रकल्प मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण , गुणवंत कर्मचारी अधिकारी /कर्मचारी ,कर्मचारी दिन संकल्पना , योजनांची मार्गदर्शिका तयार करणे, विविध योजनाचे सॉफ्टवेअर तयार करणे यासारखे उपक्र्म समाज कल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनतुन राबविण्यात येत आहे.
समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, “ विभागातील कर्मचारी यांचे विविध प्रश्न सोडविण्यात येत आहेत. कर्मचारी यांचा आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. त्यातुनच वर्षभरात एकुण १६० कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. तसेच आज अखेर आश्वासित प्रगती योजनेस पात्र असलेल्या मात्र पुर्तता अभावी लाभ मंजुर न झालेल्या कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय प्रमुखामार्फत पुर्तता करावी असे आवाहन करण्यात येत असुन पुर्तता केल्यास पुढच्या टप्यात त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येईल ”