नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात समाज कल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन “सामाजिक न्याय पर्व ” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध लोकाउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, तसेच योजनाचा लाभ व्यापक प्रमाणात देण्यासाठी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत विभागाचे कर्मचारी यांचे प्रश्न निकाली काढण्यात येत आहे.
समाज कल्याण कार्यालयाने राज्यतील ९६ कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर केला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम कर्मचाऱ्यांसाठी पर्वणीच ठरला आहे. समाज कल्याण विभागातील गृहपाल,समाज कल्याण निरिक्षक व कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचा-यांना १०-२०-३० वर्षाच्या नियमित सेवेनतरची तीन लाभांची सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा प्रश्न प्रंलबित होता. त्याअंनुषगाने समाज कल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीची नुकतीच बैठक सपन्न झाली होती.
सदर बैठकीत पात्र असलेल्या विभागातील ९६ कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
९६ कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. त्यात गृहपाल-११, समाज कल्याण निरिक्षक २५ व कनिष्ठ लिपिक ६० याप्रमाणे कर्मचा-याना लाभ मंजुर करण्यात आला आहे. कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर झाल्याने विभागातील सर्व कर्मचारी यांनी आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांचे आभार व्यक्त केले आहे. आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. सदर ९६ कर्मचारी यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचारी यानी आंनद व्यक्त केला आहे.
*“राज्यात समाज कल्याण विभागाच्या वतीने दि. १ एप्रिल ते २०२३ दि.१ मे २०२३ या महिनाभरात सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम राबवण्याचा असून त्यात विविध कार्यक्रमांवर कर्मचाऱ्यांचेही प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले आहे, त्याअंतर्गत 96 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला आहे”*
– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
Social Welfare Department Employee Benefit