इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात लग्न समारंभ म्हणजे जणू काही इव्हेंट बनले आहेत. यामध्ये वेगवेगळे विधी असतात. त्यातील एक विधी म्हणजे नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून वधू कडील तिचे भाऊ-बहीण किंवा अन्य बच्चे कंपनी वराकडून त्याचे ते नवे बूट देण्याच्या बाहण्याने पैसे तथा शगुन वसूल करतात. विशेष म्हणजे या गमतीशीर तथा मजेशीर प्रसंगी सगळ्यांचे मनोरंजन होते. परंतु त्यावरून काही वेळा वाद देखील होतात. कारण नवरदेव आपले बूट परत घेण्याच्या बदल्यात कमी पैसे देतो तर पैसे वसूल करणारी मंडळी जास्त पैसे मागतात. त्यातून नाराजी ओढवते तर कधी वादावादीचे प्रसंग उद्भवतात.
विशेष म्हणजे बूटचा हा प्रसंग अनेक हिंदी चित्रपटात हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला दिसून येतो. विशेषतः ‘हम आपके है कोन ‘ या सिनेमामधील ‘जुते लेलो पैसे दे दो.. ‘ या गाण्याने तर धुमाकूळ घातला होता तेव्हापासून अनेक लग्न कार्यांमध्ये हा विधी तथा इव्हेंट मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र त्यामध्ये वाद होऊ नये म्हणून एका वधू-वराने नवीनच आयडियाची कल्पना लढविली आहे.
पूर्वीच्या काळी एक मनोरंजक खेळ होता, तो म्हणजे एक गोल चक्राकार तबकडीमध्ये काही आकडे असतात आणि एक छोटा चेंडू त्यामध्ये ठेवून ती तबकडी गोल फिरवली जात असे, त्यानंतर तो चेंडू ज्या आकड्यावर थांबेल तितकी किंमत त्या खेळणाऱ्या खेळाडूला मिळत असे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला एखाद्या जुन्या काळातील हिंदी चित्रपटाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलास नक्कीच लक्षात येईल. अशाच प्रकारचे एक व्हील या नवदांपत्याने शोधून काढले असून ती गोल तबकडी फिरवल्यावर तो चेंडू जिथे थांबेल तितके पैसे आता बूट लपविणाऱ्या मंडळींना मान्य करावी लागतील, यासंदर्भातील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक देखील मिळत आहेत.
अशी काही प्रथा-पंरपरा असते हे फारसे कुणाला माहितीही नव्हते. पण त्यानंतर मात्र आता प्रत्येक लग्नातला तो एक सगळ्यात मुख्य इव्हेंट झाला आहे. सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या एका व्हिडिओमध्येही इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका लग्नसमारंभात सुरु असणाऱ्या बूट लपविणे आणि त्यानंतरची वसूली या प्रसंगांचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमधल्या या हुशार नवरा- नवरीने या समस्येवर एक मस्त तोडगा शोधून काढला आहे.
व्हिडिओ मध्ये असे दिसत आहे की, नवरदेवाचे बूट नवरीकडच्या मंडळींच्या हातात आहेत आणि पैसे वसूलीसाठी त्यांचा मोठ्या उत्साहात पाठपुरावा सुरू आहे. तर नवरीच्या हातात आहे एक spinning wheel. हे व्हील मोठं खास आहे. कारण या व्हिलवर पैशांचे वेगवेगळे आकडे लिहिलेले आहेत. ते व्हिल नवरीने हातात पकडलं, नवरदेवाने ते त्यानंतर ते एका रकमेवर येऊन ते थांबलं आणि ज्या रकमेवर ते आलं तेवढे पैसे नवरदेवाने नवरीच्या करवल्या आणि भावंडांना द्यायचे, असं त्यांचे डील झालं. त्यामुळे मग किती पैसे मागायचे आणि किती द्यायचे? हा वादच मिटला. या व्हिडिओवरून असं दिसत आहे की ते व्हिल खूपच कमी किमतीला येऊन थांबलं. ती किंमत पाहून नवरदेव तर खूश झाला, पण नवरीकडच्या मंडळींचा मात्र हिरमोड झाला. त्यामुळे मग एका जणाने पुन्हा ते हाताने फिरवण्याचा प्रयत्न केला. पण नवरदेवाने मात्र स्पष्ट नकार देत त्यांचा तो डाव मोडीत काढला. आता अशा व्हीलची अनेक लग्नांमध्ये मागणी होऊ शकते.
Social Viral Video Wedding Bride Groom Shoes Money Gift