इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, सध्या एक आगळीवेगळी जाहिरात खूपच व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, ती म्हणजे दोन सख्या मित्रांनी चक्क, ‘ गर्लफ्रेंड हवी ! ‘ अशी जाहिरात दिली असून यासाठी ते त्या गर्लफ्रेंडला चांगला घसघशीत पगार म्हणजे महिन्याला चक्क दोन लाख रुपये देण्यास तयार आहेत. अर्थात त्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत, परंतु या जाहिरातीला युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आणि तरुण मुली हे काम करण्यास तयार झाल्या आहेत.
सध्याचे युग हे जाहिरातीचे आहे असे म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीची जाहिरात केल्याशिवाय तुमची सेवा किंवा वस्तू यांची विक्री होणार नाही ,असे असा सर्वांचा समज आहे आणि तो प्रत्यक्ष खरा देखील आहे. आता जगभरात सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी या सहज उपलब्ध होत आहेत. पूर्वीच्या काळी लग्न जुळवण्यासाठी शोधाशोध करावी लागत होती. कालांतराने वधू वर मेळाव्याला आले, आता तर त्यासाठी अनेक मॅरेज ब्युरोच्या मॅरेज साईट सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. तसेच अनेक डेटिंग साईट्स देखील आहेत. असे सर्व असताना चीनमधील या दोन मित्रांना चांगली गर्लफ्रेंड मिळावी म्हणून त्यांच्या थायलंड मधील मैत्रिणीने जाहिरात दिली आहे. विशेष म्हणजे त्यांना चिनी नव्हे तर थायलंड मधील गर्लफ्रेंड हवी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला चिनी भाषेतचे ज्ञानदेखील अवगत असावे, अशी त्यांची अट आहे. सध्या सोशल मीडियावर गर्लफ्रेंडच्या जॉबची जाहिरात खूप व्हायरल होत आहे.
या थाई बाईने पोस्टमध्ये मी माझ्या दोन चिनी मित्रांसाठी गर्लफ्रेंड शोधत आहे असे म्हटले आहे. त्यासाठी ते दोन लाख रुपये महिन्याचा पगारही देणार आहेत. हे दोन्ही तरूण चीनमधील असून जाहिरातीत कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हेही सांगितले आहे. या गर्लफ्रेंडचे वय १८ ते २३ वर्षांदरम्यान असावे. तिला महिन्याला २ लाख १५ हजार रुपये पगार दिला जाईल. तसेच तिने चांगले काम नीट केले आणि त्या मित्रांना ते आवडले तर तिला पगारापेक्षाही अधिक पैसे मिळतील. मात्र या जॉबसाठी इच्छूक असलेल्या तरूण मुली किंवा महिलांना कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज व्यसन नसावे, असेही त्या जाहिरातीत लिहिले आहे. आता सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे. कारण गर्लफ्रेंडच्या नोकरीसाठी योग्य मिळाली असावी, असे दिसून येत आहे. मात्र अद्यापही अनेक तरुणी या पोस्टसाठी अर्ज पाठवीत असून आपल्याला चिनी भाषा येते, असे त्यांनी या अर्जात नमूद केले आहे.
Social Viral Girl Friend Demand Monthly Salary