इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडिया ही जणू काही आजच्या काळात माणसाच्या जगण्याचे अविभाज्य घटक बनला आहे, सोशल मीडियाशिवाय काहीजण अगदी एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी होतो, तसेच तो वाईट कामासाठी देखील होतो परंतु त्याचा अतिरेक देखील टाळला पाहिजे अन्यथा त्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात नुकसान करू शकतो किंवा एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते.
एका महिलेने सोशल मीडियाचा नको तितका वापर केला किंवा विनाकारण वापर केला, वास्तविक केला ती गोष्ट सोशल मीडियावर सांगण्याची गरज नव्हती परंतु त्यामुळे तिला आपली प्रचंड पगाराची नोकरी देखील गमवावी लागली. लेक्सी लार्सन नावाच्या एका महिलेने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला होता.
या बाईने आपल्याला नवीन नोकरीमध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल ६ लाखांची वाढ मिळाली हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. त्यामुळे तिला ज्याठिकाणी नव्याने नोकरी मिळाली होती, त्यामुळे कंपनीने तिची जॉब ऑफर रद्द केली. आपण साधारणपणे ठराविक वर्षांनी कंपनी बदलतो आणि चांगली आर्थिक वाढ घेऊन नवीन कंपनीत रुजू होतो. कंपनी बदलली की आपली आर्थिक वाढ होते हे जरी खरे असले तरी ते जाहीररित्या असे सगळ्यांना सांगावे का याचे भान असायला डीजे परंतु तिला ते भान राहिले नाही.
सहाजिकच या कंपनीने सुरक्षिततेचे कारण देत या महिलेला नोकरीवरुन काढून टाकल्याचे सांगितले. पहिल्या नोकरीमध्ये लेक्सी हिला ५६ लाख रुपये पगार होता. नवीन कंपनीने तिच्या पगारात १६ लाखांची वाढ करत तिला महिन्याला ७२ लाख पगार देण्याचे कबूल केले होते. मात्र अशाप्रकारे टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून लेक्सीने आपली पैसे खर्च करण्याची सवय आणि वाढलेल्या पगाराची रक्कम याविषयी सांगितले. आनंदाच्या भरात केलेले हे कृत्य तिला खूपच महागात पडले.
मात्र हा व्हिडिओ कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळाला, तेव्हा कंपनी लेक्सीचे अकाऊंट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजले, तेव्हा बॉसच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी तिने आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ डिलिट केला. अशाप्रकारे पगारात झालेली वाढ जाहीर करणे कायद्यानुसार अचूक नव्हते. मग कंपनीने तिला नोकरीवरुन का काढले ? असा जाब तिने विचारला.
कंपनीने कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नसले तरी आम्हाला अशाप्रकारची रिस्क घ्यायची नाही असे सांगितले. या व्हिडिओमुळे लेक्सीच्या टिकटॉक फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. आता तिला ३३ हजार लोक फॉलो करत असून हा पगाराशी संबंधित व्हिडिओ १० लाखांहून अधिक जणांनी पाहिला. मात्र समाधान म्हणजे तिने पहिल्या नोकरीच्या ठिकाणी पुन्हा अर्ज केल्यानंतर तिला त्याठिकाणी परत नोकरीवर घेण्यात आल्याचे तिने सांगितले.
Social Media Post Company Fired Women from Job Viral Post