इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सरबद्दल सध्या लोकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. कधी कधी हे लोक पडद्यामागे कसे आहेत, हे कुणालाच कळत नसतं. आणि मग त्यांच्या जाळ्यात सापडण्याची शक्यताही असते. अशीच एक सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर जसनीत कौर ब्लॅकमेलर असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि आता तिला अटक झाली आहे.
जसनीतचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. अर्थात अश्लील रिल्स पोस्ट करून तिने हे फॉलोअर्स कमावले. शेकडो फॉलोअर्स तिला पर्सनल मेसेजेस करू लागले. यात अनेक गडगंज श्रीमंत लोकही होते. त्यामुळे त्यांना जाळ्यात अडकवून पैसे कमावण्याची संधी तिला दिसू लागली. अनेकांना ती आपले अश्लील फोटो पाठवायची. त्यानंतर जसनीतच्या संपर्कात येणाऱ्यांना ती पहिले प्रेमात पाडायची.
त्यांच्यासोबत वेळ घालवायची. आणि मग ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करायची. जसनीतच्या जाळ्यात अनेक लोक आले आणि त्यांनी तिला बदनामी टाळण्यासाठी लाखो रुपये दिले. त्यामुळेच ती ७५ लाख रुपयांच्या बीएमडब्ल्यूमध्ये फिरायला लागली होती. अनेकांना तिचा हा प्रकार दिसत होता, पण पुरावे नसल्याने आणि हिंमत होत नसल्याने कुणीच तक्रार करत नव्हते. एका व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिला मोहालीतून अटक केली आणि आता पुढील दोन दिवस तिची कसून चौकशी होणार आहे.
राजकीय पाठबळ
जनसीतला हे उद्योग करण्यासाठी तिचा एक राजकीय मित्र मदत करीत असल्याचे पोलिसांना कळले आहे. एका राजकीय पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता असलेला हा मित्र बरेचदा ग्राहकही शोधून देत असे, अशीही माहिती आहे. चौकशीदरम्यान त्याचा खुलासा होणार असल्याने साऱ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे.
गँगस्टरकडून धमकी
ब्लॅकमेल करताना संबंधिताला बरेचदा गँगस्टरकडून धमकीचे फोनही जायचे. त्यामुळे ते लोक जीवाच्या भितीने घाबरून जसनीतला पैसे देत होते. त्यामुळे जसनीतचे गुन्हेगारी विश्वातही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्यापाऱ्यामुळे बिंग फुटले
जसनीत ही पंजाबमधील संगरूर जिल्ह्याची रहिवासी आहे. लुधियानाचा एक व्यापारी गुरबीर तिच्या जाळ्यात अडकला. तिने त्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. पण गुरबीर तिच्या धमकीला घाबरला नाही आणि त्याने मोहालीत तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
https://twitter.com/NikhilCh_/status/1642896828160004104?s=20
Social Media Influencer Jasneet Kaur Arrested by Police