शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या या निर्देशांचे पालन करावे….

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2024 | 1:52 pm
in स्थानिक बातम्या
0
social media

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. निवडणुकीच्या वेळी उमेदवार / राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करतात. मात्र, असा प्रचार करताना उमेदवारांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना या अर्जात त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडियाद्वारे केलेला जाहिरातींवरील खर्च त्यांच्या खर्चाचे हिशेबात दाखविणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेश इ. बाबत आदर्श आचारसंहिता तरतुदी लागू आहेत. इलेक्ट्रॅानिक मीडियावर करावयाच्या प्रचार जाहिरातीसाठी माध्यम प्रमाणिकरण सनियंत्रण समिती (Media Certification and Monitorintg Committee) द्वारा तपासूनच, अशा जाहिराती प्रसारीत करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर सदर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची प्रिंट मीडिया, सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींवर करडी नजर राहणार आहे.

जिल्हास्तरावर मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आला असून पोलिस सायबर विभागाचे तज्ञ अधिकारी या सेलमध्ये कार्यरत राहतील. या सेलचे सोशल मीडियाद्वारे करण्यात येणा-या राजकीय जाहिरातींवर लक्ष असेल. सोशल मीडियाद्वारे मानहानीकारक संदेश पाठवणे, धार्मिक भावनांना धक्का पोहोचणारे, भावना भडकावणारे, समाजातील शांतता, एकोपा यांना तडा देणारे विघातक संदेश पाठविण्यावर या सेलचे विशेष लक्ष आहे. राजकीय पक्ष / उमेदवारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की, इंटरनेट माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रचारावर देखील आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत. मतदारांना जात / धर्मावर आधारित मतदान करण्याबाबत आवाहन करता येणार नाही. धार्मिक स्थळ, पूजा स्थळांचा वापर निवड़णूक प्रचारासाठी करता येणार नाही. तसेच सोशल मीडियावरून करण्यात येणा-या जाहिरातींद्वारे वाईट भाषा आणि मानहानीकारक भाषा वापरून निवड़णूक प्रचार करता येणार नाही.

जिल्ह्यातील मतदारांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या विघातक जाहिराती, जनतेत तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तीच्या संदेशाकडे लक्ष न देता सद्सद विवेकबुध्दीने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर…या ३८ उमेदवारांना मिळाली संधी

Next Post

माहीम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे विरोधात शिवसेना ठाकरे गटाने दिला हा उमेदवार…तिरंगी लढत होणार

Next Post
udhava

माहीम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे विरोधात शिवसेना ठाकरे गटाने दिला हा उमेदवार…तिरंगी लढत होणार

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011