नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शासकीय वसतिगृहांतून हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे. समाज कल्याण विभागामार्फत राज्यात एकूण 441 शासकीय वसतिगृहे चालवली जातात या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थीना दर्जेदार सोयी सुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे यासाठी विभागाने आता या सर्व शासकीय वसतिगृहे ही आदर्श वसतिगृह करण्याचे ठरविले आहे.
याबातत राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल यांची नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता त्याप्रसंगी याबाबत माहिती दिली आहे. गृहपाल हे वसतिगृहाचे सर्वसर्वा असतात. त्यांनी आपल्या वसतिगृहाची तपासणी स्वत:च करावी काही समस्या असतील तर त्या सोडवाव्यात प्रत्येक वसतिगृहाचे एक व्यवस्थापन आराखडा (management plan) तयार करुन आयुक्तालयास सादर करावा, समाज कल्याण विभागातील सर्व शासकीय वसतिगृहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तसेच आदर्श वसतिगृहे म्हणून तयार करायचे असल्याचे आयुक्त यांनी यावेळी सांगितले.
वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थी हा समाजासाठी एक आदर्श म्हणून तयार झाला पाहिजे यांची जबाबदारी तेथील गृहपालावर आहे. गृहपाल हे सामाजिक न्याय विभागातील Core Cadre आहेत. आपल्या वसतिगृहातील सगळे रेकॉर्डस अद्यावत करा. स्टॉक बुक्स, सहा गठ्ठे पद्धतीनुसार सर्व रेकॉर्डस तयार करा. आपल्या वसतिगृहात आदर्श विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे याकरीता विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींयुक्त योग्य व्यवस्था करा. जेवणासाठी चांगल्या पद्धतीने व्यवस्था करा. स्वच्छता ठेवा. पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. वॉटर ची व्यवस्था करा. आपल्या वसतिगृहाची तपासणी गृहपालांनी स्वत: करावी. काही समस्या असतील तर त्या आपल्या विभाग प्रमुखांमार्फत आयुक्तालयास कळवा. प्रत्येक वसतिगहात युपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शनचे वर्ग सुरु करा. प्रमुख वक्त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करा. अशाप्रकारे सर्व सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्या. असेही मा. आयुक्त महोदयांनी आपल्या बैठकीत उपस्थित सर्वांना सुचित केले
शासकिय वसतिगृहातून नवनवीन बाबी तसेच उपक्रम राबविण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न व इतर गोष्टींचा समावेश करून अशा आदर्श वसतिगृहांचा गौरव करण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धा आयोजित करुन राज्यस्तर, विभागीय स्तर व जिल्हास्तर असे पारितोषिक देण्यात येणार आहे. विभागच्या विविध कार्यक्रमात ह्या आदर्श वसतिगृहांचा गौरव दरवर्षी करण्यात येणार आहे. त्याबाबत नियमावली तयार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यासाठी विशेषता शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणुन वसतीगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागात असणा-या वसतीगृहांतुन अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकासाची वसतीगृहे ही केंदे बनली आहेत. विद्यार्थांच्या जडणधडणीत मोलाचे स्थान ह्या वसतीगृहांचे आहे. “ *राज्यातील एकुण ४४१ शासकीय वसतीगृहातुन जवळपास ५० हजाराहुन अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय* *झाली आहे. या वसतीगृहाचा दर्जा अधिक उंचविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडुन विविध प्रयत्न केले गेले जात आहेत.
आदर्श वसतिगृह संकल्पनेने विद्यार्थाची गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे, लकरच यासंदर्भात रुपरेषा निश्चित करण्यात येईल. ”* डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे.