नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ आज प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. यामध्ये डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, कथक नृत्यागणा, विनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020साठी तर वर्ष 2021साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात आला. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून 29 महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, या महिला समाजाला दिशादर्शक असे काम करतात. त्यांचा कार्याचा गौरव व्हावा म्हणुन त्यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.
पशुपालन तसेच सौर ऊर्जा उपकरणांद्वारे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणाऱ्या उस्मानाबाद येथील सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार (वर्ष २०२१) प्रदान करण्यात आला.
(बघा व्हिडिओ)
पशुपालन तसेच सौर ऊर्जा उपकरणांद्वारे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणाऱ्या #उस्मानाबाद येथील सामाजिक उद्योजिका #कमलकुंभार यांना आज राष्ट्रपती श्री #रामनाथकोविंद यांच्या हस्ते #नारीशक्तीपुरस्कार (वर्ष २०२१) प्रदान करण्यात आला#जागतिकमहिलादिन#InternationalWomensDay2022 pic.twitter.com/ZosX5s55jm
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 8, 2022