नवी दिल्ली – देशातील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण 18 कोटींहून जास्त नागरिकांनी कोविड -19 प्रतिबंधक लस घेतली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 26,02,435 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 18,04,57,579 मात्रा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 96,27,650 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 66,22,040 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,43,65,871 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिली मात्रा), 81,49,613 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वर्षे वयोगटातील 42,58,756 (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,68,05,772 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 87,56,313 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,43,17,646 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,75,53,918 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच यांचा समावेश आहे.
आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 66.73% मात्रा देशातील दहा राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 3,28,216 लाभार्थ्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतली आहे आणि लसीकरण मोहिमेच्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 42,58,756 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाची आतापर्यंतची एकूण आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे.
गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 11 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या. लसीकरण मोहिमेच्या 119 व्या दिवशी, (14 मे 2021 रोजी) कोविड प्रतिबंधक लसीच्या 11,03,625 मात्रा देण्यात आल्या. एकूण 11,628 लसीकरण सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून 6,29,445 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 4,74,180 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.