टोरंटो – झोप ही जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु अनेकदा इतरांच्या घोरण्यामुळे आपली झोपमोड होते. मात्र घोरण्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, असे कॅनडामधील टोरंटो युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, झोपेत अडथळा आणणार्या घोरण्याच्या समस्येचा संबंध त्या व्यक्तीच्या मेंदूशी असतो आणि त्याचा विचारवर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. अशा समस्येमध्ये, झोपेत व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेमध्ये थोडा त्रास होतो, ज्यामुळे घोरण्याचा आवाज ऐकू येतो.









