येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवी दिल्लीच्या विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (यु.जी.सी.) येवला येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राला २०२५-२६ शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्त (ऑटोनॉमस) महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. तर स्वायत्तता शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कार्यान्वित करणार आहे शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता जपल्याने स्वायत्तता मिळालेले हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पहिले महाविद्यालय ठरले असल्याचे संस्थेचे संचालक कुणाल दराडे, कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी सांगितले.
एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय २००६ पासून बाभुळगाव येवला येथे सुरु झाले असून विविध अभियांत्रिकी शाखाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्त यासाठी ओळखले जाते. विशेष म्हणजे मागील १९ वर्षात परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना उत्तम अभियंते घडवून महाविद्यालयाने नावलौकिक मिळविला आहे.किंबहुना परिसराच्या विकासासाठी देखील नक्कीच सकारात्मक योगदान दिले आहे. सध्या माविद्यालयात अभियांत्रिकीच्या सात विविध शाखासह बीबीए बीसीए एमसीए एमबीए अभ्यासक्रमात १६०० विध्यार्थी शिकत आहेत तर नवीन प्रवेशित ९०० विध्यार्थी आहेत असे एकूण २५०० एकूण संख्या होईल .
ग्रामीण भागात असूनही अत्यंत कमी कालावधीत स्वायत्तता दर्जा मिळविणारे महाविद्यालय म्हणून एसएनडी अभियांत्रिकीच्याशि रपेचात अजून एक सन्मान वाढला आहे. स्वायत्त महाविद्यालय म्हणून आता एसएनडी अभियांत्रीकी महाविद्यालय अभ्यासक्रमामध्ये कालानुरूप तसेच औदयोगिक क्षेत्रास लागणारा बदल करू शकणार असल्याची माहिती प्राचार्य डी.एम यादव दिली. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी गरजेवर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रम देखील देऊ शकते. नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करू शकणार आहे तसेच परीक्षा आणि मूल्यमापन करण्यासाठी महाविद्यालय स्वतंत्र असले तरी पदवी मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच मिळणार आहे.एस एन डी अभियंत्रिकीच्या या दैदीप्यमान यशाबद्दल मार्गदर्शक मा . आमदार नरेंद्र दराडे, संस्थाध्याक्ष आमदार किशोर दराडे,सचिव कुणाल दराडे संचालक रुपेश दराडे यांनी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयातील अनुभवी शिक्षकवृंद, गुणवत्तापूर्ण शिक्षण ,रोजगाराच्या उपलब्ध संधी याद्वारे महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे.यावेळी .सिव्हिल विभागप्रमुख डॉ उबेद अन्सारी,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार ,कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ गिरीशा बोंबले इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ पवन टापरे शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. संदीप येवले रजिस्ट्रार प्रा. दत्तात्रय क्षीरसागर , एमबीए विभागप्रमुख प्रा. पी. एम दंडगव्हाळ, एमसीए विभागप्रमुख साठे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकम , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे , मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ हर्षल राणे इलेकट्रॉनिक्स, ऍण्ड कॉम्पुटर विभागप्रमुख प्रा. गणेश ढाके डॉ अजित भाने प्राध्यापक व उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय विद्यापीठबरोबर सामंजस्य करार करणार
“स्वायत्तता मिळाल्यानंतर व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख असा विद्यार्थी विकासाचा अभ्यासक्रम आम्ही राबवून विद्यार्थ्यांना त्यात्या क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्याचा आमचा सकारात्मक प्रयत्न असेल.नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना आम्हाला याचा उपयोग होणार आहे . गुणवत्ता वाढीसाठी विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बरोबर सामंजस्य करार करणार आहे “.
-डॉ. डी. एम.यादव, प्राचार्य,एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय
मोठया वटवृक्षात बदल
“२००६ मध्ये अभियांत्रिकीच्या तीनपाच शाखेवर सुरु झालेल हे छोटेसे रोपटे आता अभियंत्रिकी, व्यवस्थापन,औषधनिर्माण शास्त्र ,नर्सिंग तंत्रनिकेतन,सीबीएसई स्कुल ज्युनिअर कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालय या रूपात मोठया वटवृक्षात बदल झालेले आहे. हजारो विध्यार्थी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या मध्ये उच्च पदावर काम करत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आम्ही यशस्वी झालो असून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. लवकरच स्वायत्त विद्यापीठ करण्याचा मानस आहे.”
रुपेश दराडे, संचालक जगदंबा शिक्षण संस्था