अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरातील वल्लभनगर वसाहतीत राहणारे काटवे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या विटा घरासमोर ठेवलेल्या होत्या त्या विटाच्या ढिगाऱ्यामध्ये सकाळी नागाचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने सर्पमित्र दिपक सोनवणे यांना फोन केला. सर्पमित्र दिपक सोनवणे त्या ठिकाणी पोहचले व त्या विटा मजुरांच्या साहाय्याने बाजूला काढून त्या नागास मोठ्या शिताफीने पकडले. त्यात आज नागपंचमी असल्याने परिसरातील महिलांनी त्याची पूजा केली. हा नाग बघण्यास परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. नागास बरणीत टाकल्या नंतर त्यास वनविभागाच्या हवाली करण्यात आले व त्याची सुटका नैसगिर्क अधिवासात करण्यात आली.