सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक…बिबट्यांच्या कातडीची तस्करी; पोलीस हवालदारासह ८ जणांना घेतले ताब्यात

by India Darpan
ऑगस्ट 13, 2023 | 2:15 pm
in संमिश्र वार्ता
0
image00188XZ

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथल्या काही टोळ्या बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात गुंतलेल्या आहेत आणि बिबट्याच्या कातड्यांच्या विक्रीसाठी संभाव्य खरेदीदारांचा शोध घेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार टोळीतील सदस्यांना पकडण्यासाठी सविस्तर योजना आखण्यात आली.

योजनेनुसार खरेदीदार म्हणून मुंबई झोनल युनिट (गोवा प्रादेशिक युनिट)चे अधिकारी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरला पोहोचले. वाटाघाटीच्या अनेक फेऱ्यांनंतर, विक्रेत्यांनी बिबट्याचे पहिले कातडे श्रीनगरमधील डलगेटजवळ नियोजित ठिकाणी आणले. पाळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी नेमलेल्या जागेजवळ बिबट्याची कातडी घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीनगरमधील सार्वजनिक ठिकाणी त्याच्या आणखी एका साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले.

या प्राथमिक यशानंतर विक्रेत्यांच्या दुसर्‍या टोळीशी वाटाघाटी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. रात्रभर वाटाघाटी केल्यानंतर, विक्रेते शेवटी ३ बिबट्यांची कातडी नियोजित ठिकाणी आणण्यास सहमत झाले. प्रतिबंधित वस्तू (३ बिबट्यांची कातडी) घेऊन जाणाऱ्या ३ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून या व्यवहाराशी संबंधित आणखी ३ जण सार्वजनिक ठिकाणी जवळपासच वाट पाहत असल्याचे धागेदोरे हाती लागले. अधिकाऱ्यांची २ पथके तात्काळ रवाना करण्यात आली आणि त्या सार्वजनिक ठिकाणी त्यांनी ३ जणांना ताब्यात घेतले. अशाप्रकारे, वन्यजीवांच्या या अवैध व्यापारात गुंतलेल्या एका पोलीस हवालदारासह एकूण ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आणि एकूण ४ बिबट्यांची (पँथेरा परडस) कातडी जप्त करण्यात आली. लडाख, डोडा आणि उरी येथून बिबट्याची शिकार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 50(1)(c) च्या तरतुदीनुसार एकूण ४ बिबट्यांची कातडी जप्त करण्यात आली.

वन्यजीव (संरक्षण) कायदा1972 अंतर्गत प्राथमिक जप्तीच्या कारवाईनंतर वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा करणाऱ्या 8 व्यक्ती आणि जप्त केलेल्या प्रतिबंधित वस्तू, जम्मू आणि काश्मीर वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

Smuggling of leopard skins
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी आवश्यक; सायखेडा ग्रामपंचायतीने केला ठराव

Next Post

महापालिकेचा टाऊन हॉल फोडून लोखंडी खुर्चींच्या प्लेटा चोरणा-याला २ वर्ष १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

महापालिकेचा टाऊन हॉल फोडून लोखंडी खुर्चींच्या प्लेटा चोरणा-याला २ वर्ष १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा

ताज्या बातम्या

IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011