नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये २५ पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील सुपरस्पेशालिटी सेवा असलेल्या मूत्रविकार विभागात योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांचे मूत्रविकार आजारांपासून मोठ्यांपर्यंतचे क्लिष्ट आजारांवर याठिकाणी उपचार शक्य झाले आहेत. मुत्राविकाराशी संबंधित सर्व आजारांवरील उपचार हे मिनिमली इन्व्हेजिव या अद्ययावत तंत्रज्ञानाने केले जात आहेत. शिवाय, रुग्ण लवकर बरा होऊन घरी परतत असल्याची माहिती येथील मूत्रविकार तज्ञ डॉ. नरसिंग माने यांनी दिली.
ते म्हणाले की, मूत्रविकार सहसा अनेकजन अंगावर काढतात किंवा त्यांना याबबतची माहिती नसावी. परंतु हा आजार अजिबात अंगावर काढण्यासारखा नाही. मूत्रविसर्जन करताना वेदना अथवा त्रास होणे, मूत्राशय व आजूबाजूच्या भागांना सुज येणे, लघवी होताना त्रास होणे कुंथावे लागणे, पुन्हा-पुन्हा लघवीला जावे लागणे थोडी थोडी लघविला होणे, लघवी द्वारे रक्त येणे, पोटात खालील भागात (ओटीपोटात) वेदना होणे, पाठीत व पोटात दुखणे, अचानक खूप जोरात लघवीला लागल्यासारखे जाणवणे, मूत्राशय, मुत्रनलिका, मूत्रपिंड यांना सूज येणे अशी अशी अनेक प्रकारची लक्षणे ही मुत्राविकाराशी निगडीत असतात.
मूत्रविकार सर्वसाधारणपणे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे, अस्वच्छ कपडे, मासिक पाळीच्या वेळी योग्य ती काळजी न घेणे, क्षारयुक्त पाण्याचे अधिक काल सेवन करणे, लैंगिक संक्रमित रोग, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ होणे, वृद्धांमध्ये मधुमेह, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यामुळे मूत्रविकार होण्याच्या शक्यता बळावतात. त्यामुळे आजार अंगावर न काढता तात्काळ वैद्यकीय सल्ला घेतला तर आजार नक्कीच वेळेत बरा होऊ शकतो.
वेळोवेळी एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांत मोफत तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन दिले जाते. आजार बळावलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशालिटी उपचारांसाठी रुग्ण आता उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर परिसरच नव्हे तर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशीम व हिंगोलीसह गुजरात व मध्यप्रदेशाच्या सीमाभागातून रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. समृद्धी महामार्ग असलेल्या जिल्ह्यांमधून तर हे रुग्ण अवघ्या काही तासांत रुग्णालय गाठत असून परवडणाऱ्या दरांत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा या रुग्णांना याठिकाणी मिळत आहे.
गेल्या तीन वर्षात सुपर स्पेशालिटी सेवांचा तब्बल ७२ हजार ७४२ रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्याखालोखाल आयपीडी म्हणजेच आंतररुग्ण विभागात गेल्या तीन वर्षांत १० हजार २५५ इतकी होती. शस्रक्रिया झालेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ९४७ इतका झाला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत कार्डधारक रुग्णांची संख्या अधिक होती. शासकीय योजनेअंतर्गत अधिक चांगल्याप्रकारे सर्वसामान्यांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा दिल्यामुळे राज्य सरकारकडून एसएमबीटी हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आला आहे.
स्वतंत्र मूत्रविकार विभाग
गेल्या काही दिवसांत एसएमबीटी हॉस्पिटलच्या स्वतंत्र मूत्रविकार विभागामध्ये मुत्ररोगावरील अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून दुर्बिणीद्वारे व्हसिको व्हेजिनल फिस्तुला, किडनी कर्करोगाच्या शस्रक्रिया, अड्रीनल ग्लान्ड शस्रक्रिया यांसोबतच खराब झालेल्या किडनीची शस्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची शस्रक्रिया, मूत्रमार्गातून रक्तस्राव होणे, व्हसेक्टोमी रिव्हर्सल तसेच मूत्रमार्गातील अडथळ्यांवर अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
किडनी ट्रान्सप्लांट मोफत
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण) पूर्णपणे मोफत केले जात आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शासकीय योजनेअंतर्गत समाविष्ट केल्यामुळे याचा सर्वसामान्य रुग्णांना लाभ होणार आहे. पांढऱ्या, पिवळ्या आणि केसरी रेशनकार्डधारकांसाठी आता हे उपचार एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत उपलब्ध आहेत.
२५ विभागांच्या सेवा एकाच छताखाली
एकाच छताखाली २५ वेगवेगळया विभागांच्या स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा देणारे एसएमबीटी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल आहे. विशेष म्हणजे,प्रत्येक विभागात तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध असून येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत.
या शस्रक्रिया मोफत
अन्जिओग्राफी, अन्जिओप्लास्टी, जन्मजात हृदयविकार, बलून शस्रक्रिया, ई-पी स्टडी, पेसमेकर, बायपास, वॉल्व्ह दुरुस्ती व बदल, लहान मुलांची ओपन हार्ट सर्जरी, तोंडाचा, जिभेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय व अंडाशयाचा कर्करोग, जठर व आतड्यांचा कर्करोग, थायरॉईड ग्रंथींचा कर्करोग मूत्राशयाचा कर्करोग, मेंदूतील गाठींची शस्रक्रिया, कवटीचे हाड बसवणे, मणक्यातील नस मोकळे करणे, मणक्यातील नसा व गाठींची शस्रक्रिया, पोटातील क्लिष्ट शस्रक्रिया, लहान-मोठे आतडे, स्वादुपिंड, जठर, अन्ननलिकेच्या दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथींची दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, किडनीस्टोन, मूत्रमार्गातील अडथळे, किडनीची शस्रक्रिया, गुडघा-खुबा सांधे प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे लिगामेंटची शस्रक्रिया व सर्व प्रकारचे फ्रॅक्चर शस्रक्रिया.