नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा फार्मसीच्या तब्बल ७२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण होण्याआधीच अनेक विद्यार्थ्यांच्या हातात नोकरी असून अडीच लाख रुपये ते १० लाख रुपये प्रतिवर्ष अशा वार्षिक पॅकेजवर विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याचे महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अतुलनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिक माहिती अशी की, एसएमबीटी शैक्षणिक संकुल येथे एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा फार्मसी असे दोन औषधनिर्माण महाविद्यालय आहेत. याठिकाणी तब्बल दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन्हीही महाविद्यालये गेल्या 20 वर्षांपासून याठिकाणी सुरु आहे. तब्बल १५ पेक्षा अधिक स्टाफ हा पीएचडी धारक आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच अनेक प्रकारच्या उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिप स्किल्स आपसूक प्राप्त होतात तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या देशामध्ये प्रतिनिधित्व करता येते त्यामुळे गुणवत्तेतदेखील वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ठसा उमटविण्यात विद्यार्थ्यांना यश आल्याचे डॉ. उशीर म्हणाले.
एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गेल्या पाच वर्षांत ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याआधीच नोकऱ्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची इतर देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. अनेक ठिकाणी उच्च पदांवर हे विद्यार्थी कार्यरत आहेत. मेडिकल क्षेत्र जसजसे वाढत चालले आहे तशा स्पर्धादेखील वाढल्या असून अनेक कंपन्या नवनव्या उपक्रमांत सहभागी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी दरवर्षी इच्छुक असतात. गेल्या दोन वर्षांत तब्बल ४ वेळा विविध कंपन्यांनी याठिकाणी भेटी देत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याठिकाणी स्वतंत्र प्लेसमेंट ड्राईव्ह विभाग असल्यामुळे विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
महाविद्यालयाचा बँकॉक येथील महीडॉल युनिव्हर्सिटी, थायलंड येथील प्रिन्स ऑफ सोंग्क्ला युनिव्हर्सिटी, नेपाळ येथील काठमांडू युनिव्हर्सिटी, गंदकी मेडिकल कॉलेज पोखरा नेपाळ, मलेशिया येथील इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी, इंडोनेशिया मलाहयाती युनिव्हर्सिटी इंडोनेशिया) व लोट्स होलिस्टिक हेल्थ सेंटर (युएई) यांच्याशी उच्च शिक्षण, संशोधन आणि स्टुडंट एक्स्चेंज करार झालेले आहेत.
विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना प्राधान्य
शिक्षणासोबत नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि जागतिक व्यासपीठावर सादरीकरण करण्यासाठी महाविद्यालया GPAT, NIPER मार्गदर्शन, रिसर्च प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, अल्युमनी कनेक्ट, उद्योगदौरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी विद्यार्थ्यांना सशक्त करणारे उपक्रम वर्षभर राबवले जातात.
या कंपन्यांचा समावेश
सिप्ला, आयपीसीए, एफडीसी, रॅनबॅक्सी, ब्ल्यू क्रॉस, टीसीएस, मॅक्लिओड्स, मायलन, ग्लेनमार्क, ग्लॅक्सो, सायटेक, गिब्स, डब्ल्यूएनएस, अपोलो वेलनेस, सन्डोज आणि युनिकेम लॅबोरेटरी इ. औषधनिर्माण क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यांचा समावेश आहे.
शिक्षण, संस्कार आणि संधी यांचा संगम
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर औद्योगिक ज्ञान, संवाद कौशल्य, आणि जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व यामध्ये आपला ठसा उमटवला आहे. आमचे प्रशिक्षित प्राध्यापक, प्रात्यक्षिक उपक्रमांवर आधारित शिक्षण, आणि देशविदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांसोबतच्या सहयोगामुळे हे शक्य झाले आहे.
-डॉ. योगेश उशीर, प्राचार्य
एसएमबीटी औषधनिर्माण शास्र महाविद्यालय