नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलच्या वतीने सोमवार (दि २०) ते शनिवार (दि २५) बालहृदय विकार व शस्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांवर या शिबिरात मोफत उपचार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन मोफत उपचार करून घ्यावेत असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन हजार पेक्षा अधिक बालकांवर आतापर्यंत यशस्वी हृदयउपचार करण्यात एसएमबीटी हॉस्पिटलमधील हृदय विकार तज्ञांना यश आले आहे. या महिन्यात हे शिबीर संपूर्ण आठवडाभर आयोजित करण्यात आले असून नामवंत वरिष्ठ बालरोग व जन्मजात हृदयविकार तज्ञ डॉ सुरेश राव व एसएमबीटी हॉस्पीटलामधील हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ विद्युतकुमार सिन्हा हे स्वत: या शिबिरादरम्यान बालकांवर उपचार करणार आहेत. डॉ. राव हे गेल्या ३३ वर्षांपासून बालहृदय विकारांवर काम करत असून हजारो बालकांना त्यांनी नवे जीवन दिले आहे.
लहान मुलांमध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण मोठे आहे. दर हजार जन्मलेल्या बालकांमध्ये जन्मत: हृदयरोग असल्याचे प्रमाण 6 ते 12 टक्के जास्त आहे. भारताच्या जन्मदराचा विचार केल्यास कन्जनायटल हार्ट डिसिज असणारी सुमारे 1.5 लाखाहून अधिक बालके दरवर्षी जन्मतात असे सांगितले जाते. लहान मुलांत जे जन्मजात आजार आढळतात त्यात जन्मजात हृदयरोगाचा वरचा क्रमांक आहे. लहान मुलांचे बालहृदय विकारांचे प्रमाण अधिक असूनही तज्ञ डॉक्टरांची मात्र कमी वेळोवेळी जाणवते.
ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या शहरात जाऊन याठिकाणी उपचार करावे लागतात. अशा अवघड समजल्या जाणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात एसएमबीटी हॉस्पिटलने पुढाकार घेतला. ग्रामीण भागात ठिकठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून दीड हजार पेक्षा जास्त शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त बालकांवर मोफत उपचार केले आहेत.
विशेष म्हणजे, बालहृदय विकारांवर विशेष लक्ष केंद्रित करत दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार आणि रविवारी बालहृदय विकारांवर याठिकाणी मोफत उपचार केले जात आहेत. अनेक बालकांवर हृदय उपचार म्हणून डिव्हाईस क्लोजर हे उपचार केलेले आहेत. परंतु, काही बालकांवर हार्ट सर्जरी करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.
यासाठीदेखील एसएमबीटी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांनी पुढाकार घेत या या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेच्या माध्यमातून बालकांवर मोफत हृदयउपचार होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खास डॉक्टरांसाठी लाईव्ह वर्कशॉप
येत्या शुक्रवारी आणि शनिवारी नामवंत बालरोग व बालहृदयविकार तज्ञ डॉ सुरेश राव व एसएमबीटी हॉस्पीटलामधील हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ विद्युतकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालहृदय विकार व कन्जनायटल हार्ट शस्रक्रिया या विषयावर लाईव्ह कार्यशाळेचे आयोजन एसएमबीटी हॉस्पिटलच्या लेक्चर थियेटर येथे आयोजित करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून कार्यशाळेसाठी नोंदणी मात्र अनिवार्य आहे. जास्तीत जास्त डॉक्टरांनी लाभ घ्यावा असेही आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलमधील सुविधा
•१ हजार बेडचे प्रशस्त हॉस्पिटल
•१०० आयसीयू बेड्स
•१७ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर्स
•अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण कॅथलॅब
•१० एनआयसीयू व पीआयसीयू बेड
•२४ तास डायलिसिस व औषधालय सुविधा
या सुविधा पूर्णत: मोफत
• नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी पूर्णपणे मोफत
• मोतीबिंदू शस्रक्रिया पूर्णपणे मोफत
• लहान मुलांचे लसीकरण पूर्णपणे मोफत
• १४ वर्षांपर्यंत बालकांवर मोफत उपचार
• रुग्णांसाठी मोफत बससुविधा (नाशिक, कसारा व कल्याण येथून दरदिवशी)
• बाह्यरुग्णांसाठी पहिल्या तीन दिवसांचे औषधे मोफत
• लहान मुलांचे अतिदक्षता विभाग अर्थात एनआयसीयु पीआयसीयु पूर्णत: मोफत
• ओपीडी तपासणी पूर्णपणे मोफत
• रुग्णांना राहणे व जेवण मोफत
• मोफत गरोदर मातांची सोनोग्राफी आणि रक्ततपासणी पूर्णपणे मोफत
• कुटुंब कल्याण शस्रक्रिया मोफत
• शासनमान्य गर्भपात शस्रक्रिया पूर्णपणे मोफत
अल्पदरांत या सुविधा उपलब्ध
• अल्पदरात गर्भशयाची (हिस्टेरेक्टॉमी) अवघ्या ४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध
• दुर्बिणीद्वारे गर्भाशय तसेच अंडाशय शस्त्रक्रिया (लॅप्रो स्कोपिक हिस्टरेक्टॉमी) अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध वंध्यत्व तपासणी (इन्फर्टीलिटी) अवघ्या ३ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध
SMBT Hospital Free Child Heart Surgery Camp