रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये जगप्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट प्रा. यान कोवाच यांनी तासाभरात केल्या या दोन शस्रक्रिया…

मार्च 20, 2025 | 5:08 pm
in संमिश्र वार्ता
0
SMBT News Prof Jan Kovac visit

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हृदय आजारामुळे श्वसनाच्या त्रासाने अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या दोन रुग्णांवर एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्लिष्ट तावी शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली. जगप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट प्रा. यान कोवाच यांच्या उपस्थितीत या दोन्ही शस्रक्रिया झाल्या. एका तावी शस्रक्रियेसाठी किमान दीड तासांचा कालावधी लागतो मात्र, एसएमबीटीच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये अनुभवी आणि कुशल वैद्यकीय टीमच्या सहकार्याने दोन्ही शस्रक्रिया अवघ्या तासाभरात पार पडल्या. दोन्हीही रुग्ण सुखरूप असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती हृदयविकार तज्ञ डॉ गौरव वर्मा यांनी दिली.

अधिक माहिती अशी की, जगप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. यान हे एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये रविवारी विशेष भेटीसाठी आले होते. त्यांच्या उपस्थितीत हृदयविकारातील अद्ययावत उपचार प्रणाली असलेली तावी शस्रक्रिया दोन रुग्णांवर यशस्वी करण्यात आल्या. जेव्हा येथील सोयीसुविधा त्यांनी पहिल्या आणि तावीसह येथील इतर शस्रक्रियांचा खर्च त्यांना सांगितला, तेव्हा ते आवाकच झाले. एवढ्या कमी खर्चात उपचार होत असल्याने त्यांनी सर्वसामान्यांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलची आरोग्यसेवा वाखाणण्याजोगी असल्याचे म्हटले. अतिशय आदर्शवत असे हे मॉडेल असून ग्रामीण भागात एवढे अद्ययावत उपचार होत असतील असे मला पहिल्यांदाच जाणवले. येथील सोयीसुविधा, अद्ययावत साधनसामुग्री आणि अत्याधुनिकतेची धरलेली कास यामुळे भारतातील भेट फलदायी ठरल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी, अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व हृदयविकारतज्ञ डॉ गौरव वर्मा, डॉ विद्युतकुमार सिन्हा, सीओओ सचिन बोरसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात सर्वात अद्यायवत तावी शस्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सातत्याने होत आहेत. तावी झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सर्वाधिक असल्याची माहिती घेऊन आपण एसएमबीटीत आल्याचे प्रा. यान म्हणाले. युरोपमध्ये तावी शस्रक्रिया करण्यासाठी रुग्णांमध्ये जनजागृती असल्यामुळे कल अधिक आहे परिणामी वेटिंगवर अनेक रुग्ण ठेवावे लागतात. भारतात ग्रामीण भागातदेखील एवढ्या अद्यायवत उपचार सुविधा उपलब्ध होत असतील तर येणाऱ्या काळात उल्लेखनीय काम एसएमबीटीसारख्या हॉस्पिटलकडून होणार असल्याचे प्रा. कोवाच म्हणाले.

प्रारंभी, एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने प्रा. यान कोवाच यांचे भारतीय परंपरेनुसार औन्क्षण करण्यात आले त्यानंतर पुष्पमाला घालून त्यांचे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्वागत केले. दरम्यान, हॉस्पिटलमधील विविध विभाग पाहिले प्रत्येक विभागात असलेली रुग्णांची गर्दी पाहून याठिकाणी हॉस्पिटल कीती गरजेचे होते याचे उत्तर मिळाल्याचे प्रा. कोवाच म्हणाले. हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, सीओओ सचिन बोरसे, SMBT हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि प्रख्यात हृदयतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा, हृदयविकार शस्रक्रिया विभागप्रमुख विद्युतकुमार सिन्हा, डॉ लिंडा, डॉ ऋषिकेश तामसेकर, डॉ स्नेहल नील, डॉ सलमान अहमद, डॉ प्रशांत पवार यांच्यासह आणि कार्डियाक टीमसोबत संवाद साधला.

येथील वातावरण, सोयीसुविधा व उपचारांमधील अत्याधुनिकता यामुळे भारतात यापुढे आलो की, एसएमबीटी हॉस्पिटलला यायला नक्की आवडेल असेही प्रा. यान म्हणाले. आधुनिक हृदयरोग उपचार पद्धती, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रातील नव्या संधी आणि तावी प्रक्रियेचे जागतिक महत्त्व यावर मार्गदर्शन करत असताना आंतरराष्ट्रीय करार करण्याबाबत प्रयत्न केले जातील. नव-नवे तंत्रज्ञान, माहितीची देवान-घेवाण आणि प्रत्यक्ष अनुभव या बाबी लक्षात घेऊन पुढे वाटचाल होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर यांनी सांगितले.

प्रा. यान कोवाच यांच्या एसएमबीटी हॉस्पिटलमधील भेटीनंतर सायंकाळी नाशिक शहरातील हृदयविकार तज्ञांसाठी विशेष सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरासह पंचक्रोशीतील ५० ते ६० हृदयविकार तज्ञ व हृदयविकार शस्रक्रिया तज्ञ व फिजिशियन्स उपस्थित होते. अद्ययावत तंत्रज्ञानाने काळानुसार उपचारप्रक्रियांत बदल करणे क्रमप्राप्त होत चालले असून एसएमबीटीने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे ज्ञानात भर पडत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.

तावी शस्रक्रिया म्हणजे काय?
ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे. ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते.

ग्रामीण भागातील अत्याधुनिक सुविधा पाहून आवाक
ग्रामीण भागात हॉस्पिटल असले तरी कनेक्टीव्हीटी या हायवेमुळे (समृद्धी महामार्ग) वाढली आहे. अन्जिओग्राफी, अंजिओप्लास्टी, बायपास, डिव्हाइस क्लोजर अशा प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुविधा याठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या प्रकारे असलेले कार्य खरच प्रेरणादायी आणि प्रशंसात्मक आहे. पैशांच्या किंवा बिलाच्या अभावी रुग्ण रुग्णालयातून परत जाऊ नये हा हॉस्पिटलचा उद्देश अभिमानास्पद आहे.
प्रा. यान कोवाच, जगप्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट

एसएमबीटीत ५० टक्के सवलतीत तावी शस्रक्रिया
एसएमबीटीचा हृदयविकार विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत हृदयविकार विभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी मोठे काम होत आहे. यावर्षी २०२५-२६ मध्ये तावी शस्रक्रीयांसाठी ५० टक्के सवलत दिली जात आहे. दिल्ली, मुंबई व पुणे सारख्या रूग्णालयापेक्षाही याठिकाणी उपचार खर्च हा ५० टक्के कमी आहे. उपचार कमी खर्चात करत असताना कुठल्याही प्रकारे रुग्णांच्या उपचारांचा दर्जा, गुणवत्ता यात तडजोड केली जात नाही. तसेच तावीसाठी वापरला जाणारा ईंडीजीनस वॉल्व्ह व त्याची गुणवत्ता खूप चांगली असून रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे.
डॉ गौरव वर्मा, संचालक, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीची मालिका सुरूच…दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

Next Post

१३६ इन्फंट्री (टेरिटोरियल आर्मी) मध्ये पदभरती…बघा, पात्रता, आवश्यक दस्तावेज

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Untitled 50

१३६ इन्फंट्री (टेरिटोरियल आर्मी) मध्ये पदभरती…बघा, पात्रता, आवश्यक दस्तावेज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011