इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सॅमसंगने Galaxy Unpacked 2022 या कार्यक्रमामध्ये Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यावेळी गॅलेक्सी टॅब एस8 सीरीजदेखील लॉन्च करण्यात आली असून सॅमसंग वॉलेट आणि वन यूआय4 सादर करण्यात आले आहेत. सॅमसंगचे ग्राहक या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. दोन्ही फोनमध्ये अतिशय सुंदर रंगांचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये Phantom Black, Phantom White, Green आणि Pink Gold पर्यायांचा समावेश आहे. दोन्ही फोन IP68 वॉटर रेझिस्टन्ससह येतात. चला तर मग जाणून घेऊया Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ ची वैशिष्ट्ये आणि किंमत.
Samsung Galaxy S22 आणि S22+ या स्मार्टफोन्सच्या कॅमेरा स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, फ्रंट कॅमेरा 10 मेगापिक्सेलचा (F2.2, FOV80) आहे. तसेच, अल्ट्रा फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 12MP अल्ट्रा वाइड (F2.2, FOV120) कॅमेरा पाहायला मिळतो. शिवाय, 50PM वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरांचा त्याच्यासोबत समावेश असणार आहे.
दोन्ही फोनच्या बॅटरी लाइफ S22 दीर्घ बॅटरी बॅकअपची अपेक्षा करणाऱ्यांना निराश करू शकते. कारण Samsung S22वर 3700mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, S22+ मध्ये 4500 mAh बॅटर देण्यात आली आहे. S22 चार्ज करण्यासाठी, फोनसोबत 25W चार्जर वायर देण्यात आले असून, 15W पर्यंत वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत, हा फोन इतर अनेक स्मार्टफोन्सपेक्षा वरचढ आहे. कारण या फोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट, सॅमसंग वॉलेट नॉक्स व्हॉल्ट, यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. S22 मध्ये 6.1-इंच फुल एचडी प्लस स्क्रीन पाहायला मिळेल. तर, S22+ मध्ये एक मोठी 6.6 इंच फुल एचडी प्लस स्क्रीन या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये डायनॅमिक एमोलेड 2एक्स देण्यात आला आहे. गेम मोडसाठी 249Hz टच सॅम्पलिंग रेट आहे.
एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, फिंगरप्रिंट सेन्सर, गायरो सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, हॉल सेन्सर, लाईट आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये पहायला मिळतात. Galaxy S22+ 5G, LTE, WiFi 6E ची नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. Galaxy S22 मध्ये WiFi 6, WiFi डायरेक्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोनची किंमत सुमारे 59 हजार 792 रुपये आहे. Samsung Galaxy S22+ स्मार्टफोन सुमारे 74 हजार 753 रुपये आहे. फोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे.