नवी दिल्ली – अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असून असे सांगण्यात येते. खरच स्मार्टफोनचा इतका वापर वाढला आहे की, जणू काही ती मूलभूत गरज बनली आहे. परंतु प्रत्यक्षात स्मार्टफोनमुळे एक गोष्टी सोप्या झाल्या तरी त्याचा गैरवापर देखील होत असून त्याचे अनेक दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अगदी कौटुंबिक कलहाला देखील स्मार्ट पुन्हा कारण ठरत असून मुले आणि पालक यांमधील संबंध स्मार्टफोनमुळे बिघडत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
स्मार्टफोनमुळे आपल्या अनेक गरजा सोप्या झाल्या आहेत. बाहेरगावी किंवा दूर असतानाही आपल्या प्रियजनांशी फोनद्वारे जोडलेले राहतो. पण फोनच्या अतिवापराने मूले तुमच्यापासून दूर जात आहेत, असे सायबरमीडिया रिसर्च (सीएमआर) च्या इंपॅक्ट ऑफ स्मार्टफोन ऑन ह्युमन रिलेशनशिप २०२१ च्या अहवालातून समोर आले आहे, तसेच स्मार्टफोनच्या अतिवापराचा मुलाच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो, असेही स्पष्ट झाले आहे.
1 ) सर्वेक्षण अहवालानुसार, 66 टक्के नागरिकांचा असा विश्वास आहे की त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.
2 ) 74 टक्के भारतीयांच्या मते, स्मार्टफोन मुळे मुलांशी त्यांचे संबंध बिघडत आहेत.
3 ) 75 टक्के व्यक्तींचा असा विश्वास आहे की, स्मार्टमुळे लक्ष विचलित होते, त्यामुळे ते आपल्या मुलांबाबत अधिक सतर्क राहू शकत नाहीत.
4 ) 74 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, ते स्मार्टफोनमध्ये व्यस्त असतात आणि मुले काही विचारतात तेव्हा त्यांची चिडचिड होते.
5 ) स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांचे लक्ष विचलित होत नाही, असे 69 टक्के जणांचे मत आहे.
6 ) 90 टक्के पालकांना असे वाटते की, स्मार्टफोन वापरामुळे मुले आक्रमक होत आहेत.
7 ) 85 टक्के पालकांचा असा विश्वास आहे की, मुले स्मार्टफोनमुळे सामाजिक जीवनापासून दूर जातात.
8 ) 90 टक्के पालक असे मानतात की, मुलांमध्ये सामाजिक वर्तन कमी होत आहे.
कोविड-19 दरम्यान भारतीयांनी दिवसाचे सुमारे 6.5 तास मुलांबरोबर घालवले आहेत,
9 ) 80 टक्के पेक्षा जास्त व्यक्तींना असे वाटते की, स्मार्टफोन्स त्यांना प्रियजनांशी जोडलेले राहण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात.
10 )94 टक्के नागरिकांचा असा विश्वास आहे की, स्मार्टफोन त्यांच्या शरीराचा एक भाग बनला आहे आणि ते त्यांच्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. कारण जेवताना 70 टक्के, दिवाणखान्यात 72 टक्के आणि कुटुंबासोबत बसताना 75 टक्के व्यक्ती फोन वापरतात.