पुणे – आजच्या काळात प्रत्येकालाच स्मार्टफोन हवा असतो, परंतु त्याच्या किमती बघून अनेकांना तो घेणे शक्य नसते. मात्र आता आपल्या बजेटमध्ये स्मार्टफोन मिळणे शक्य आहे. सध्या बाजारात या प्रकारचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. केवळ 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या अशा फोनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आजच्या काळात कमी किंमतीचे स्मार्टफोन सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या अनेक नवीन लॉन्चसह अधिकाधिक लोकप्रिय आणि स्पर्धात्मक बनले आहेत. या कमी किंमतीच्या श्रेणीमध्ये असे काही स्मार्टफोन आहेत जे चांगले कॅमेरा, बॅटरी आणि गेमिंग परफॉर्मन्स देतात. तसेच स्मार्टफोन्स उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले, जलद चार्जिंग सपोर्ट आणि काही विशेष वैशिष्ट्यांसह देण्यात येत आहेत. या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकू या…
1) Realme Narzo 30A :
हा एक बजेट मधील 4G स्मार्टफोन असून यात 6000mAh बॅटरी आहे. एका चार्जवर सुमारे दोन दिवस टिकू शकते. यामध्ये 6.5-इंचाचा 720p, LCD 269 PPI रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि सर्वत्र जाड बेझल्स आहे. USB-C पोर्ट आणि मायक्रोफोन व्यतिरिक्त, तळाशी 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरसह 3GB रॅमसह सुसज्ज आहे आणि Android 10 वापरतो. यात दोन बॅक कॅमेरे असून ज्यात 13-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आणि एक ब्लॅक व्हाईट सेन्सर आहे. या Realme Narzo 30A ची सुरुवातीची किंमत 8,999 रूपये आहे.
2) Micromax IN 2b :
हा मायक्रोमॅक्सचा एंट्री-लेव्हल फोन आहे, त्यात HD+ रिझोल्यूशनसह 6.52-इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Unisoc T610 प्रोसेसर वापरण्यात येतो. IN 2b 6GB पर्यंत RAM सह येतो आणि ते खूप उपयुक्त ठरेल. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सेल ड्युअल-कॅमेरा सिस्टम आहे. Micromax IN 2b सुरुवातीची किंमत: 8,999 रूपये आहे.
3) Moto E7 Plus :
हा अतिशय चांगला फोन असून त्याची रचना साधी आहे. फोनमध्ये 6.5 इंचाची मोठी स्क्रीन आहे. बॅक पॅनलवर एक चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल असून दोन कॅमेरा सेन्सर आणि एक LED लाईट होस्ट करतो. प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे, तर दुसरा मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आहे. E7 Plus क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 चिपसेटसह 4GB RAM सह देण्यात येत आहे. Moto E7 Plus सुरुवातीची किंमत 8,999 रूपये आहे.
4) Realme C25
हा कंपनीचा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. त्यात 18W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे आणि तो MediaTek Helio G70 प्रोसेसरद्वारे देण्यात येत आहे आणि त्यात 4GB RAM आहे. या फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Realme C25 सुरुवातीची किंमत 9,999 रूपये आहे.