सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या काळात स्मार्टफोनने आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान घेतले आहे स्मार्टफोनच्या सहाय्याने आपण अनेक गोष्टी करतो, आता ते ऑनलाइन क्लासेसशी संबंधित असो किंवा ऑफिसचे काम असो, आपण स्मार्टफोनचा दीर्घकाळ वापर करत असतो. . शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या लोकांना स्मार्टफोनची गरज आहे. परंतु स्मार्टफोन चा वापर करतांना महत्वाचे काम येते ते म्हणजे फोन चार्ज करणे. फोन चार्ज केल्याशिवाय फोन वापरू शकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की फोन योग्य प्रकारे चार्ज केल्याने तुमच्या फोनच्या बॅटरीची कार्यक्षमता आणखी सुधारू शकते? त्याच वेळी, चुकीच्या मार्गाने चार्ज केल्यास तुमच्या फोनवर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. अशा परिस्थितीत फोन चार्ज करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढू शकते.
पहिली गोष्ट म्हणजे, फोनवर कोणतेही अॅप वापरल्यानंतर, आपण ते अॅप बंद केले पाहिजे, कारण हे अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि फोनच्या बॅटरीचा वापर देखील करतात. त्याच वेळी, अनेक लोक फोनची पूर्ण बॅटरी कमी असतानाच फोन चार्ज करतात, तर असे करणे चुकीचे आहे. वास्तविक, फोनमध्ये दिलेली लिथियम-आयन बॅटरी शून्यावर पोहोचू देऊ नये.अशावेळी, आपण फोन डिस्चार्ज होण्याची प्रतीक्षा करू नये.
अनेकांना रात्री फोन चार्जवर लावून झोपण्याची सवय असते, जी अत्यंत चुकीची आहे. जास्त वेळ फोन चार्ज करणे बॅटरीसाठी हानिकारक ठरू शकते. मात्र, आजकाल फोनची बॅटरी पूर्ण भरली की चार्जिंग आपोआप थांबते. अशावेळी कोणतीही अडचण येत नाही. याशिवाय फोन चार्ज करण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा कोणत्याही सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करणे टाळावे. यामुळे तुमचा डेटा हॅकर्सकडे जाण्याची शक्यता आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की अनेक लोक फोन चार्ज करतानाही फोन वापरत राहतात, असे करणेही चुकीचे आहे.खरतर,, चार्जिंग दरम्यान फोनची एनर्जी वेगळी असते. अशा परिस्थितीत तुम्ही ते वापरू नका आणि फोन जलद चार्ज होऊ द्या.