इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या आपल्या देशातील मार्केटमध्ये आता स्मार्ट वॉचचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातील स्मार्टवॉच आल्या त्या वेळी त्यांची किंमत आवाक्याबाहेर होती. सर्वसामान्य नागरिकांना स्मार्टवॉच घेणे परवडत नव्हते. आता मात्र या मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आल्या आहेत. स्पर्धा वाढल्याने स्मार्टवॉच निर्मात्या कंपन्यांनी आपल्या प्रोडक्टची किंमत कमी करुन त्यात जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
आता युजर्सना चांगल्या स्मार्टवॉचसाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही, रिअलमी, नॉइज , boAt, Boult आणि Fire Bolt सारख्या अनेक कंपन्या कमी किमतीत चांगल्या फीचर्ससह स्मार्टवॉच देत आहेत. तुम्हीही कमी किमतीत उत्तम स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टवॉच खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, या लेखातून तुम्हाला चांगले पर्याय मिळू शकतील. आता 2000 रुपयांपर्यंतच्या बेस्ट पाच स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत.
बोल्ट ड्रिफ्ट
यामध्ये 1.69 इंचाचा डिसप्ले आणि 500 निट्सची ब्राइटनेस आहे. हार्ट रेट मॉनिटर आणि ऑटोमॅटिक स्लीप मॉनिटर सारखी वैशिष्ट्ये देखील या घड्याळात उपलब्ध आहेत. ब्लड प्रेशर मॉनिटर, ब्लड सॅचुरेशन ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, मासिक पाळीचा मॉनिटर यासारखे अनेक स्पोर्ट्स मोड्स घड्याळात उपलब्ध आहेत. या घड्याळात कॉल करण्याची सुविधा उपलब्ध नाही. Boult Cosmic ची किंमत 1,999 रुपये आहे.
नॉईज कलरफिट पल्स 2
स्मार्टवॉच 1.8 इंच टीएफटी एलसीडी डिसप्ले आणि 7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह 50 हून अधिक स्पोर्ट्स मोडमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त क्लाउड बेस्ड वॉच फेसेस आणि पाणी आणि धूळ प्रतिरोधक IP68 रेटिंग आहे. नॉईज कलरफिट पल्स 2 मध्ये हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी SpO2, तणाव, स्लीप मॉनिटर व महिला सायकल ट्रॅकिंग यासारख्या आरोग्य ट्रॅकिंग फीचर्स आहेत. ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन, मिस्ट ग्रे, रोझ पिंक आणि स्पेस ब्लू या पाच रंगांमध्ये हे घड्याळ 1,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
पेबल स्पार्क
1.7 इंच फुल एचडी डिसप्ले, 240×280 पिक्सेल रिझोल्यूशनसह उपलब्ध आहे. यात, फाइंड फोन आणि व्हॉइस असिस्टंट यांसारखी फीचर्स देखील आहे. एबल स्पार्कमध्ये कॉल करण्यासाठी इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर उपलब्ध आहेत. पेबलच्या या घड्याळात सायकलिंग, धावणे, टेनिस असे अनेक क्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. 15 दिवसांच्या स्टँडबायसह घड्याळाला पाच दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. हे घड्याळ फ्लिपकार्टवरून 1,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते.
नॉइज कलरफिट पल्स बझ
1.69 इंचाचा टीएफटी एलसीडी डिसप्ले देण्यात आला आहे. या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग उपलब्ध आहे. यात कॉलिंगसाठी मायक्रोफोन आणि स्पीकर दिला आहे. नॉईज कलरफिट पल्स बझ सायकलिंग, हायकिंग, रनिंग यासारखे 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड ऑफर करते. 24 तास हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप मॉनिटरिंग सारखी फीचर्स या घड्याळात देण्यात आली आहेत. हे घड्याळ 1,999 रुपये किमतीत खरेदी केले जाऊ शकते.
फायर बोल्ट निन्जाला
1.3 इंच IPS आणि 2.5D कर्व्ड ग्लास सेफ्टीसह मेटल बॉडी मिळते. वॉटर रेसिस्टंट आणि डस्टप्रूफसाठी याला IPX8 रेटिंग आणि ब्लूटूथ v5.0 साठी सपोर्ट देण्यात आला आहे. टच टू वेकअप, ब्लड ऑक्सिजन सेन्सर (SpO2), 24×7 हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग यासारखी वैशिष्ट्ये या घड्याळात दिसत असून त्याची किंमत केवळ 1,799 रुपये इतकी आहे.
Smart Watch 5 Best Options Below 2 Thousand Rupees Technology Tips