पुणे – आजकाल लोक आपल्या टीव्हीवर पारंपरिक चॅनल बघतातच, शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर आवडते कार्यक्रमसुद्धा पाहतात. हीच बाब लक्षात घेऊन आता कंपन्यांनी कमी बजेट सेगमेंटमध्ये स्मार्ट टीव्ही बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व टीव्हीमध्ये गुगलपासून नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसारख्या ओटीटी अॅपपर्यंतचा सपोर्ट दिला जात आहे. जर तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक टीव्ही घेऊन आलो आहोत. त्यांची किंमत १५ हजार रुपयांहून कमी आहे.
KODAK 7XPRO : १३,७९९ रुपये
बजेट टीव्हींच्या सेगमेंटमध्ये हा टीव्ही सर्वोत्तम आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आणि बिल्ट इन क्रोमकास्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. यूजर्स या टीव्हीवर नेटफ्लिक्स, डीज्नी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूबचा कंटेट पाहू शकतात. त्यासोबतच स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी वायफाय आणि यूएसबी पोर्ट सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
Infinix X1 : १४,४९९ रुपये
हा स्मार्ट टीव्ही ३२ इंच आकारासोबत उपलब्ध आहे. या टीव्हीचे डिझाइन आकर्षक आहे. या टीव्हीमध्ये एपिक २.० पिक्चर इंजिन आणि एचडीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये वायफाय, यूएसबी आणि एचडीएमआय पोर्टसारखे फिचर देण्यात आले आहेत.
iFFALCON by TCL : १४,९९९ रुपये
हा स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, डीज्नी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूब सपोर्ट करतो. यामध्ये गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी आणि एचडीएमआय पोर्ट देण्यात आले आहेत.
Mi 4A PRO : १४,९९९ रुपये
या टीव्हीमध्ये ३२ इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. नेटफ्लिक्स, डीज्नी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूबसारख्या अॅपचा वापर केला जाऊ शकतो. गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये १ GB रॅम आणि ८ GB स्टोरेज देण्यात आला आहे, त्याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये दोन स्पिकर आणि तीन एचडीएमआय पोर्ट मिळणार आहेत.