पुणे – नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करणार्या ग्राहकांना चांगली संधी चालून आली आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या फेस्टिव्हल सीजन सेलमध्ये स्वस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. सेलमध्ये १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे ३२ इंचाचे स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर बँकिंग डिस्काउंट ऑफर दिले जात आहेत.
Realme Smart TV Neo – 14,999 रुपये
रियलमीचा हा टीव्ही ३२ इंचाच्या बेजल लेस डिस्प्लेसह मिळत आहे. याला TUV Reheinland कडून लो ब्लू लाइट प्रमाणपत्रही मिळाले आहे. आवाजाचा दमदार अनुभव घेण्यासाठी या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह २० वॉटचे ड्युअल स्पिकर देण्यात येत आहेत. हा टीव्ही क्रिस्टल क्लिअर साउंड क्वालिटी ऑफर करतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
Thomson 32 PATH 0011BL – 13,499 रुपये
या स्मार्ट टीव्हीमध्ये ३२ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रेझोल्यूशन १३६६/७६८ आहे. तर रिफ्रेश रेट ६० Hz आहे. स्मार्ट टीव्हीचा ऑस्पेक्ट रेशो १६ः०९ आहे. यामध्ये दोन १२ वॉटचे दोन स्पिकर्स देण्यात आले आहे. हे एकूण २४ वॉट साउंड आउटपूटसोबत मिळतात. त्यामध्ये २ यूएसबी पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट, हेडफोन स्पिकर्स आउटपूट देण्यात आले आहेत.
Kodak 32HDX7XPRO- 12,999 रुपये
Kodak 32HDX7XPRO HD (१,३६६ x ६८६ पिक्सल) एलइडी टीव्हीमध्ये ६० एचझेड रिफ्रेश रेट आणि अल्ट्रा-थिन बेझल उपलब्ध आहे. हा टीव्ही २४ वॉटच्या स्पिकरसह मिळतो. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये तीन एचडीएमआय पोर्टसह दोन यूएसबी स्लॉटसुद्धा समावेश आहे. या स्मार्ट टीव्ही फिचर्समध्ये व्हॉइस सर्च, गुगल प्ले अॅक्सेस आणि इनबिल्ट क्रोमकास्टचा समावेश आहे.
Mi TV 4A Pro – 14,999 रुपये
या टीव्हीमध्ये एचडी (१,३६६x ७६८ पिक्सल) पॅनल आहे. त्याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ आहे. हा टीव्ही डीटीएस-एचडी साउंडसह २० वॉट स्पिकरसोबत मिळतो. हा अँड्रॉइड टीव्ही ९.० सोबत पॅचवॉल ३.० इंटरफेससह चालवतो. टीव्हीमध्ये इनबिल्ट व्हाय-फायसह गुगल असिस्टंट सपोर्टसारखे फिचर्स आहेत. स्पेसिफिकेशन्समध्ये तुम्हाला एक प्रोसेसर मिळणार आहे. त्यामध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेजसह पेअर केला जातो. टीव्हीमध्ये तीन एचडीएमआय आणि दोन यूएसबी पोर्ट आहेत.