नवी दिल्ली : नवनवीन प्रयोग करत, युझर्सना नवीन सुविधा देत त्यांच्या मनातील आपले स्थान आणि दर्जा टिकवण्याच्या प्रयत्नात ऍप्पलचे स्मार्टफोन नेहमीच यशस्वी होतात. त्यामुळेच ते नेहमी नंबर वन असतात. यावेळी मात्र, त्यांचा नंबर घसरला आहे. स्मार्ट फोनच्या या क्रमवारीत यावेळी सॅमसंगने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, या क्रमवारीत चीनच्या शाओमी कंपनीने तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांच्या स्मार्ट फोनच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट रिसर्च फर्म Canalys ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. एकंदरीतच स्मार्ट फोनच्या विक्रीत जगभरात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंगने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच ७६.५ मिलियन स्मार्टफोनची विक्री केली. यामुळे सॅमसंगचा मार्केट शेअर जवळपास २२ टक्के झाला. या काळात स्मार्टफोनच्या विक्रीमुळे ६६ टक्क्यांचा फायदा झाला. यात Galaxy S21 सिरीजच्या स्मार्टफोनचा मोठा वाटा आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान ऍप्पलने ५२.४ मिलियनच्या आयफोन्सची विक्री केली. यामुळे १५ टक्क्यांच्या शेअर्ससह ऍप्पल या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ५ जी असलेल्या आयफोन १२ ला या काळात सर्वाधिक मागणी होती.
या अहवालानुसार, ओप्पो आणि व्हिव्हो या चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनला जास्त पसंती मिळाली. वास्तविक, अमेरिकेने या चिनी कंपन्यांवर बंदी घातल्याने त्यांना त्याचा फटका बसला. Huawei या यादीत सातव्या स्थानावर आहे.
चिपच्या कमतरतेमुळे होऊ शकते नुकसान
ऍप्पलची ही घसरण कदाचित अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. कारण, चिपचा तुटवडा असल्याने एप्रिल ते जून या तिमाहीत जवळपास ३ ते ४ बिलियन्सचे नुकसान होऊ शकते. चिपच्या तुटवड्यामुळे ipads आणि Macbooks च्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो.