मुंबई – भारतीय शेअर बाजारासाठी यंदाचे वर्ष म्हणजे २०२१ हे खूप यशस्वी मानले जाते. कारण यंदा मोठ्या संख्येने लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही साखर कारखान्याच्या पेनी स्टॉकचा देखील समावेश असून त्यांनी अनेक गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यातील महत्वाच्या अशा 5 पेनी स्टॉक बद्दल जाणून घेऊ या…
बजाज हिंदुस्तान शुगर
गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत ₹ 14.50 वरून ₹ 16.60 झाली आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या भागधारकांना सुमारे 14.50 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी हा स्टॉक ₹ 6.15 वरून ₹ 16.60 प्रति शेअरवर गेला आहे. एकूण 170 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एकेकाळी हा स्टॉक चक्क 400 रुपयांपेक्षा जास्त होता, परंतु नंतरच्या काळात त्यात थोडी घसरण झाली तरी तो आता एक महत्त्वाचा पेनी स्टॉक बनला आहे.
धारणी शुगर्स अँड केमिकल्स
या कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी सहा महिन्यांत सुमारे 230 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षाच्या कालावधीत, हा शेअर ₹ 5.70 वरून ₹ 21.05 पर्यंत वाढला आहे.
के.एम. साखर कारखाना
या स्टॉकने गुंतवणूकदारांन गेल्या एका महिन्यात 12.50 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 6 महिन्यांत त्याचे दर ₹ 12.50 वरून 28.30 इतके झाले आहेत. म्हणजेच या काळात सुमारे 125 टक्के वाढ झाली आहे. या वर्षी साखर कंपनीची साधारण शेअर किंमत 11.90 वरून 28.30 प्रति शेअर अशी वाढली आहे.
सिम्बोली शुगर्स
याच्या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत गेल्या एका महिन्यात 26.15 वरून 31.20 प्रति स्टॉक झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 19.50 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यांत, शेअरची किंमत 7.65 रुपये प्रति शेअर वरून 31.20 रुपये प्रति शेअर झाली आहे. म्हणजेच या काळात सुमारे 305 टक्के वाढ झाली.
श्री रेणुका शुगर्स
हा पेनी स्टॉक गेल्या एका महिन्यात ₹ 26.15 वरून ₹ 30.15 पातळीवर गेला आहे. या कालावधीत त्याने सुमारे 15 टक्के वाढ नोंदवली आहे, तर गेल्या 6 महिन्यांत त्याच्या शेअरची किंमत ₹ 10.75 वरून ₹ 30.15 प्रति स्टॉक झाली आहे. त्यामुळे 2021 मध्ये रेणुका शुगरच्या शेअरची किंमत 11.85 रुपयांवरून 30.15 रुपये झाली.