इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियावर कोण, कधी, कसा स्टार बनेल सांगता येत नाही. रातोरात एखादा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि सर्वांच्या लाइक्सला मिळवितो. अशातच एका चिमुकलीने म्हटलेला ‘बे’चा पाढा चांगलाच धुमाकुळ घालतोय.
काही व्हायरल चिमुकली मुलं अभ्यासात कदाचित थोडी कमी हुशार असतील पण त्याची बोलण्यातील व वागण्यातील समज मोठ्यांनाही लाजवेल अशी असते. अशाच एका छोट्याश्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक शिक्षक या छोट्या विद्यार्थिनीला तू कशाला शाळेत येतेस असं विचारतो त्यावर ती अभ्यास करायला ऐवजी अभ्यास घ्यायला असं रोखठोक उत्तर देऊन टाकते. यावर शिक्षक तिला अभ्यास घ्यायला नाही करायला असं सांगतात मग ते तिला बे चा पाढा म्हणायला सांगतात.
असं पाहिलं तर चिमुकली बे चा पाढा म्हणते पण तिची पद्धत बघून तुम्हीही डोकं धराल यात शंका नाही. तुम्ही लहानपणी कधी तो खेळ खेळला आहात का ज्यात समोरचा जे काही बोलतो त्याचे उत्तर देण्याऐवजी आपण तेच तेच परत बोलत राहतो. यावरूनच एक कापूसकोंड्याची गोष्टही गाजली होती. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ही चिमुकली चुकांपेक्षा हुशारीने जास्त चर्चेत आली आहे. तिचा निरागसपणा नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे.
Small Girl Video viral on Social Media