इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या मोबाईल ही जणू काही प्रत्येकाच्या हातातील अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. परंतु त्याचे घातक परिणाम देखील दिसून येत आहेत. विशेषतः लहान मुलांच्या शरीराचे विपरीत परिणाम दिसून येतात, त्यामुळे बालकांमध्ये डोळ्यांचे आजार वाढले आहेत, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात लॉकडॉऊनमध्ये मुलांचा स्क्रीनटाईम अर्थात वाढला आणि आता मुलांना त्याची सवय झाली आहे. ही सवय बदलण्यासाठीही पालकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते आहे.
चीडचीड, मानसिक समस्या आणि डोळ्यांचा ताण या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता केंद्रीय शिक्षण विभागाने डिजिटल शिक्षणासाठी स्क्रीनटाईम निश्चित करणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आधी मुलांना काही वेळासाठीच मोबाईल हातात मिळत होता. शाळा, महाविद्यालय, क्लासेस, मैदानातील खेळ यात मुलांचा वेळ जात होता. पण घरी बसून मुलं मोबाईल स्क्रीनच्या अत्यंत जवळ गेले आहेत. पण यामुळे प्रत्यक्ष माणसांशी ते दूर होत असल्याचे चित्र आहे. आता कोरोना नंतर लहान मुलांच्या हातातील मोबाईल मोबाईल म्हणजे जणू काही खेळणेच बनले आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोक्याला जास्त ताण द्यावा लागत नाही; त्यामुळे वैचारिक क्षमता कमी होऊ शकते. मोबाईलवरील कोणतीही चित्रे, मेसेज, व्हिडिओ पाहून मुले भावनाशून्य, संवेदनशील होऊ लागली आहेत. सतत मोबाईल वापरल्याने मणका, कान, डोळे व मेंदूच्या समस्या वाढून मुले होऊ शकतात नैराश्यग्रस्त. मोबाईलच्या स्क्रीनवर सतत राहिल्याने डोळे आणि त्यातील कॉर्निया कोरडे पडून ते जळजळ करतात आणि चष्मा लागू शकतो. बोटांचा वापर कमी होत असल्याने लिखाणाची सवय कमी होऊन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
भयानक बाब म्हणजे लहान मुले ही स्क्रिनच्या अगदी जवळून मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे त्यांना मायोपिया सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मायोपिया या आजारांमध्ये, मुलांच्या डोळ्याच्या बाहुलीचा आकार वाढल्यानं प्रतिमा रेटिनापेक्षा थोडी पुढे तयार होते. त्यामुळे दुरवरील वस्तू पाहण्यास अडचण होते. अनेक संशोधनांमधून असं समोर आलं आहे की, छोटी डिजिटल स्क्रिन ही डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अशातच ज्या लहान मुलांना चष्मा आहे, त्यांचा नंबर खूप लवकर वाढतो.
विशेष म्हणजे सतत डोळ्यांची उघडझाप होणे, दुरवरचे कमी दिसणे, पाहण्यात किंवा अक्षर वाचताना अडचण येणे, डोकं दुखणे डोळ्यांत पाणी येणे, पापणीवर ताण येणे, पुस्तकांमधील अक्षरे ठळक न दिसणे यासारखी लक्षणं मायोपिया या आजारात दिसून येतात. त्यामुळे लहान मुलं अभ्यासाला बसतात, त्या ठिकाणी व्यवस्थित उजेड किंवा प्रकाश पडतोय की नाही ते पाहावे. मुलांच्या हातात मोबाईल कमी द्यावा. अभ्यासासाठी जर डिजिटल स्क्रिन लागत असेल तर मोबाईल ऐवजी लॅपटॉप द्यावा, तसेच आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे नेत्र तज्ञांचे म्हणणे आहे.
मोबाईलची सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरे काही सुचत नाही. त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात.
यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. अर्थात दोन्हीमध्ये मोबाईलचा अतिवापर हे कारण असते. सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. झोप पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते. मोबाईलच्या अती वापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे.
Small Children’s Mobile Digital Screen Disease