मुंबई – सोशल मिडियात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तसेच, आताची नवी पिढी ही अत्यंत टेक्नोसेव्ही आहे, त्यांना काहीही सांगावे लागत नाही, असे आपण वारंवार म्हणतो. त्याचा प्रत्ययही विविध माध्यमातून येत असतो. आताही तसेच झाले आहे. एक चिमुरडा आपल्या बोबड्या भाषेत अॅलेक्साला आपल्या गाण्यांची फर्माइश करतो. अॅलेक्साही इमाने इतबारे त्याचा हा हट्ट पुरवते. या साऱ्या प्रकाराचा हा व्हिडिओ सध्या खुपच गाजतो आहे. अॅलेक्सा हे तंत्रज्ञान अॅमेझॉनद्वारे पुरविले जाते. सेटटॉप बॉक्स सारखे असलेले हे उपकरण बसविले की आपल्याला हवी ती गोष्ट आपण त्याद्वारे मागवू शकतो. उदा, आपला मूड चांगला नसेल आणि आपण सांगितले तर अॅलेक्सा आपल्याला गाणे ऐकवते. घरात एखादी वस्तू संपलेली असेल (जसे की साबण किंवा अन्य) तर तुम्ही ती अॅलेक्साला सांगू शकता. ती तत्काळ ऑनलाईन ऑर्डर करते आणि वस्तू आपल्या घरपोच येते. याच अॅलेक्साशी संवाद साधणारा हा चिमुरडा आणि त्याचा हा भन्नाट व्हिडिओ नक्की बघा