निलंबित ११ कर्मचाऱ्यांच्या सेवा पुर्नस्थापित
मुंबई – समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील शासकीय निवासी शाळेतील सहाय्यक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरील ३५ कर्मचाऱ्यांचा नियमित वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून त्यातील २१ कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे,
राज्याचा समाज कल्याण विभाग कर्मचाऱ्यांसाठी पुढे सरसावला असून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येत आहेत . त्यातूनच राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतेच कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. सर्व कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून ठोक वेतनावर काम करत असून त्यांच्या सेवादेखील शासकीय नियमानुसार पूर्ण झालेल्या आहे. अशा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित १४ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्तता करावी जेणेकरून त्यांना ही लवकरच नियमित वेतनश्रेणी मंजूर करता येईल. असे आवाहन देखील आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. तसेच समाजकल्याण विभागातील राज्यातील कार्यालयांमध्ये विविध कारणांनी निलंबित असलेल्या मुख्याध्यापक, गृहपाल ,प्रमुख लिपिक, सहाय्यक ग्रंथपाल या संवर्गाच्या ११ कर्मचाऱ्यांच्या सेवा देखील पुनर्स्थापित करण्याचा निर्णय निर्णय आयुक्तालयाने घेतला आहे. आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत