मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात अनेक लोक मोठ्या आजारांना बळी पडत असताना अनेक लहान वाटणाऱ्या आरोग्य समस्यांनी देखील ते त्रस्त आहेत, त्याचा त्या व्यक्तीला आणि इतरांनाही त्रास होतो. घोरणे ही देखील अशीच समस्या आहेत. या घोरण्यामुळे किती समस्या निर्माण होतात हे सर्वांनाच माहीत आहे. घोरणे टाळण्यासाठी, लोक विविध प्रकारच्या उपायांचा अवलंब करतात, परंतु त्यातून सुटका होत नाही. या घोरण्याच्या समस्येत काही प्रमाणात कसा आराम मिळवू शकतो, यासाठी काही घरगुती उपाय आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या…
हळद आणि मध:
एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्यावे, त्यात एक चमचा मध आणि एक चमचा हळद घालावी हे मिश्रण. दररोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे, असे केल्याने घोरणे थांबण्यास मदत होईल.
लसूण :
लसणाचा वापर करून घोरण्यातही खूप आराम मिळवू शकतो, यासाठी फक्त लसणीची कळी तुपात भाजून घ्यावी लागेल आणि नंतर रोज रात्री झोपायच्या आधी ही कळी चावावी, याचा लवकर फायदा होऊ शकतो.
वेलची :
वेलचीच्या मदतीने घोरण्यापासूनही मुक्तता मिळू शकते. कोमट पाण्यात काही वेलचीचे दाणे मिसळावे, त्यानंतर झोपेच्या आधी हे पाणी नियमितपणे पिण्यास वापरावे.
ऑलिव तेल :
ऑलिव्ह ऑइल घोरणे थांबवण्यात मदत करू शकते. यासाठी आहारात ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा लागेल. त्यामुळे काही प्रमाणात घोरण्याची समस्या कमी करण्यात मदत होऊ शकते.
Sleep Snoring Suffer dos don’ts home remedies