नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील सर्वात सुरक्षित, सर्वोच्च प्रमाणित, क्रॅशसंदर्भात चाचणी करण्यात आलेल्या कार्सचे उत्पादन आम्ही करीत असल्याचा दावा स्कोडा ऑटो इंडिया कंपनीकडून केला जातो. याच कंपनीने दोन नवीन उत्पादने – कुशल ओनिक्स प्लस व स्लाव्हिया अॅम्बिशन प्लसच्या लाँचची घोषणा केली आहे. दोन्ही व्हेरिएण्ट्स उत्सवी किंमत, आकर्षक नवीन एक्स्चेंज फायदे आणि स्पेशल कॉर्पोरेट प्लान्ससह येतात, जे मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत.
कुशक ओनिक्स प्लसमध्ये नवीन आर१६ ग्रस अलॉईज व विंडो क्रोम गार्निश आहे. फ्रण्ट ग्रिल रिब्स व मागील बाजूस ट्रंक गार्निश आता क्रोममध्ये फिनिश करण्यात आले आहेत. ओनिक्स प्लसमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी १.० टीएसआय इंजिन आहे. कुशक ओनिक्स प्लसची किंमत ११.५९ लाख रूपये आहे आणि कँडी व्हाइट व कार्बन स्टील या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
स्लाव्हिया अॅम्बिशन प्लस फ्रण्ट ग्रिल, लोअर डोअर व ट्रंक गार्निशसाठी क्रोम पॅकेजसह सुशोभित करण्यात आली आहे. कारमध्ये इन-बिल्ट डॅशकॅक असेल आणि सर्व विद्यमान रंगांमध्ये उपलब्ध आहे. कुशक ओनिक्स प्लसप्रमाणे स्लाव्हिया अॅम्बिशन प्लसमध्ये देखील १.० टीएसआय इंजिन आहे. ग्राहक ६-स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमधून निवड करू शकतात. स्लाव्हिया अॅम्बिशन प्लस १२.४९ आणि ऑटोमॅटिक १३,७९ लाख रूपयांच्या विशेष उत्सवी किंमतीमध्ये उपलब्ध आहे.
मेड-फॉर-इंडिया, रेडी-फॉर-द-वर्ल्ड एमक्यूबी-एओ-इन व्यासपीठावर आधारित कुशक व स्लाव्हिया कंपनीच्या इंडिया २.० प्रकल्पाच्या भाग आहेत आणि स्कोडा ऑटो इंडियासाठी २०२२ हे बिगेस्ट इअर ठरण्याकरिता त्यांचे मोठे योगदान आहेत. या कार्सना प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (जीएनसीएपी) मध्ये संपूर्ण ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.
जीएनसीएपीच्या नवीन व अधिक कडक चाचणी प्रोटोकॉल्स अंतर्गत रेटिंग मिळालेला हा एकमेव मेड-इन-इंडिया प्लॅटफॉर्म आहे. कुशक व स्लाव्हियासाठी जीएनसीएपी अंतर्गत संपूर्ण ५ स्टार्स मिळण्यासह, तसेच कोडियक लक्झरी ४ x ४ साठी युरो एनसीएपी अंतर्गत हाच स्कोअर मिळण्यासह स्कोडा ऑटो इंडियाकडे प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी ५ स्टार रेटिंग प्राप्त व क्रॅशसंदर्भात चाचणी केलेल्या कार्सचा १०० टक्के ताफा आहे.
Škoda Auto India rings in the festivities with new variants of the Kushaq and Slavia
Škoda Auto India Launch New variants Kushaq and Slavia Car Model