घोटी – नाशिक शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील फिरण्यास गेलेल्या सहाजण शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडाले आहे. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी एका मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.हे सर्वजण नाशिक मधील मोरवाडी भागातील आहे
याबाबत अधिक वृत्त असे की, सिंहस्थनगरमधील नऊ जण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी वालदेवी नदी परिसरात फिरण्यास गेले होते. सायंकाळी सहा वाजेदरम्यान सर्वजण पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी पाण्यात तोल जावून काही जण पडले. पोहता येत नसल्याने सर्वांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. दरम्यान या घटनेत काही जण नदीच्या बाजूलाच बसून राहिल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे वृत्त आहे. सायंकाळी ७ वाजेनंतर अंधार झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. घटनास्थळी वाडीवर्हे पोलीस, तहसीलदार व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर घटनास्थळी आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरु केले आहे.
संध्याकाळी उशिरा हे नऊ जण वालदेवी परीसरात फिरण्यासाठी आले होते. त्यातील पाच मुली व एक मुलगा असे एकूण सहा जण बुडाले. एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून वाडीव-हे पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच रेस्क्यू पथक तेथे दाखल झालेल आहे. उर्वरित पाच जणांचा शोध घेण्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने बचाव पथकाला अडचणी येत आहेत घटनास्थळी वाडीव-हे पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!