लासलगाव – गेल्या काही दिवस राज्यभर चर्चा सुरू असलेल्या नव्या म्यूकोरमायसिस या नवीन रोगाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक त्यावर काय उपचार करायचा याची माहिती घेत असतानाच लासलगाव येथे म्यूकोरमायसिस या नव्या आजाराचे सहा तर येवला येथे चार रुग्ण तपासणीत दिसून आल्याची माहिती लासलगाव व येवला येथे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अविदत्त निरगुडे यांनी दिली.
सदर रूग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील तज्ञ नेत्ररोग तज्ञ यांचेकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे असेही ते म्हणाले. याबाबत आज काही रूग्ण असल्याची माहीती मिळताच लासलगाव येथील निरगुडे हाॅस्पीटलचे डाॅ अविदत्त निरगुडे यांच्याशी संपर्क साधला असता म्यूकोरमायसिस या रोगाबाबत मराठीत यास डोळे, दात व नाक या ठिकाणी काळी बुरशीचे प्रमाण वाढणे असा सरळ अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. हा आजार शक्यतो किडनी ,अवयव प्रत्यारोपण, मधुमेह व कोरोना उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये या रोगाची लागण झालेली दिसून येत आहे अशी माहिती दिली.
कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार देतांना स्टेराॅईड दिले जाते. त्यामुळे त्यामुळे रक्तशर्कराचे प्रमाण वाढते व प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे पूर्ण झालेल्या व उपचाराने बरे झालेल्या रुग्णांनी या रोगापासून बचाव व्हावा म्हणून याबाबतचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने नेत्ररोग तज्ञ ,नाक कान घसा तज्ञ, तसेच दंत चिकिस्ता वैद्यकीय रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करावी असे आवाहन त्यांनी केले.
म्यूकोरमायसिसच्या लक्षणाबाबत डॉ. अविदत्त निरगुडे यांनी रुग्णाचे नाक दुखण ,डोळे दुखणे, नाक व तोंडाजवळ काळे ठिपके होणे, डोळे सुजणे पापणी खाली पडणे मोठ्या प्रमाणात, डोके दुखणे नाक व डोळ्या जवळ त्रास होणे अशी लक्षणे असून या रुग्णांनी अशी लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत मेडिकल मधून औषधे घेऊ नयेत. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आपले आपले रक्तशर्करा राहील याबाबत जागृत करावे. तसेच झालेल्या रुग्णांनी आता आपण कोरोना उपचार घेतल्याने बरे झालो आहोत अशा अविर्भावात न राहता. त्यांच्यावर उपचार कालावधीत मोठ्या प्रमाणावर औषधांचा मारा झाल्याने बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आराम तसेच व्यायाम हा नियमित केला पाहिजे असेही डॉ
अविदत्त निरगुडे यांनी सांगितले.
तसेच कोरोना रुग्णांन ऑक्सिजनचा पुरवठा होतांना नळी स्वच्छ असली पाहिजे तसेच ऑक्सिजन मशीनमध्ये साधे पाणी न वापरता डिस्टेलरी वॉटर वापरले पाहिजे असे डॉ. निरगुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले