अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणातील पाणीसाठी ९२ टक्क्यांच्या पुढे गेल्याने संध्याकाळी सहाच्यासुमारास गिरणा धरणाचे आणखी दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्यामुळे आता धरणाच्या सहा दरवाज्यातून ७१२८ क्यूसेक्सने पाणी विसर्ग गिरणा नदीत होत आहे. या विसर्गामुळे गिरणा नदीच्या चाळीसगावकडे वाहणाऱ्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणावर आणि धरण परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.