अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला एकलव्य आदिवासीं सामाजिक संस्थेच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांना कागदपत्रांच्या अभावी आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचे दाखले, निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंगत्व योजना, तसेच घरकुल आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मंगेश औताडे,विजय कंक, अमोल पवार, शरद माळी, संजय पवार, सागर वाघ, संदीप ठाकरे, भगवान मोरे आदी सह आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.